Mumbai,Taj Hotel : एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण्याची मजा काही वेगळीच असते. इथे जाण्यासाठी फक्त तुमच्या खिशाचीच नाही तर तुमचे कपडे, वागणूक यासारख्या गोष्टींचीही काळजी घ्यावी लागते. काही हॉटेलमध्ये तर येणाऱ्या ग्राहकांसाठी वेगळे नियम बनवले जातात. अशा परिस्थितीत तिथे जाऊन तुमची वागणूक बदलावी लागते. आपल्या भाषेपासून ते जेवणाचे बिल भरेपर्यंत सगळ्या गोष्टींचे भान ठेवावे लागते. पण सोशल मीडियावर एक वेगळ्याच व्हिडिओची चर्चा आहे, ज्यात एक व्यक्ती चक्क नाण्यांनी ताज हॉटेलचे बिल भरत आहे. (The bill of Mumbai's Taj Hotel was filled with coins)
इंस्टाग्रामवर व्हायरल होणारा व्हिडिओ सिद्धेश लाकोरे नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. सिद्धेश मुंबईतले प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये गेले होते. त्यांनी मेन्यू कार्ड बघून सांगितले की, एका रगडा पूरची किंमत 800 रूपये आहे. सिद्धेशने नंतर पिज्जा आणि मॉकटेल ऑर्डर केले.
अधिक वाचा : जगातील सर्वात लहान देश, येथे केवळ 27 नागरिकच राहतात
सगळं खाऊन झाल्यानंतर त्यांनी बिल मागवले. त्याने बील भरण्यासाठी एटीएम, नोटं,किंवा डिजिटल पेमेंट न करत त्याने खिश्यातील नाणी काढली. या क्लिपमध्ये तो नाणी मोजताना दिसत आहे आणि आजूबाजूची लोकं त्यांच्याकडे हैराण होऊन बघत होते. जेवणानंतर हॉटेलचे कर्मचारी बिल घेण्यासाठी त्याच्याकडे येतात आणि तो अंगठा दाखवून 'नॅशनल युनियन चिल्लर पार्टी' म्हणतो. यानंतर कर्मचारी नाणी मोजण्यासाठी जातात.
अधिक वाचा :भारतात उन्हाळी सुट्टीत फिरण्याची ठिकाणं
खरंतरं हा व्हिडिओ सिद्धेश लाकोरे नावाच्या एका डिजिटल क्रिएटरने बनवला आहे. हा व्हिडीओ बनवण्यामागे एक उद्देश आहे की, लोकांना आपले सत्य लपवू नये, यासाठी प्रेरित केले पाहिजे. यापूर्वीही सिद्धेशने सार्वजनिक ठिकाणी लोकांसोबत असे अनेक व्हिडिओ बनवले आहेत, जे त्याने त्याच्या हँडलवर शेअर केले आहेत.