Toddler orders furniture : ऐकावं ते नवलच! लहान मुलाने आईच्या फोनवरून मागवले तब्बल १.४ लाख रूपयांचे फर्निचर

Toddler orders furniture | जेव्हा तज्ञ मंडळी सांगतात की मोबाईल, लॅपटॉप आणि कोणत्याही अन्य इंटरनेटशी संबधित असलेल्या वस्तू लॉक केल्या पाहिजेत किंवा लहान मुलांपासून दूर ठेवल्या पाहिजे. तेव्हा त्यांचा हे सांगण्यामागील उद्देश फक्त डिव्हाइस किंवा मुलांचे संरक्षण करण्यासाठी नसतो.

 The boy accidentally ordered furniture worth Rs 1.4 lakh from his mother's phone
चिमुकल्याने आईच्या फोनवरून मागवले तब्बल १.४ लाखांचे फर्निचर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लहान मुलाने त्याच्या आईच्या फोनवरून १.४ लाख रूपयाच्या किमतीचे फर्निचर मागवले.
  • वॉलमार्ट वेबसाइट ब्राउझ केल्यानंतर अयांशच्या आईने तिच्या शॉपिंग कार्टमध्ये काही वस्तू सोडल्यानंतर त्यांच्या मुलाकडून ही चुकून खरेदी झाली.
  • नवीन फर्निचरचे बॉक्स एकामागून एक त्यांच्या घरच्या पत्त्यावर पोहोचू लागल्याने पालक आश्चर्यचकित झाले.

Toddler orders furniture | नवी दिल्ली : जेव्हा तज्ञ मंडळी सांगतात की मोबाईल (Mobile), लॅपटॉप (Laptop) आणि कोणत्याही अन्य इंटरनेटशी संबधित असलेल्या वस्तू लॉक केल्या पाहिजेत किंवा लहान मुलांपासून दूर ठेवल्या पाहिजे. तेव्हा त्यांचा हे सांगण्यामागील उद्देश फक्त डिव्हाइस किंवा मुलांचे संरक्षण करण्यासाठी नसतो. तर ते याबाबत सांगत असतात कारण लहान मुलांच्या हातात मोबाईल किंवा इतर कोणतेही इंटरनेटवरील आधारित असलेले उपकरण दिल्याने अनेक चुकीच्या घटना घडण्याची शक्यता असते. तुम्ही तुमचा फोन नेहमी लॉक का ठेवावा किंवा तो तुमच्या मुलांपासून दूर का ठेवावा याबाबत न्यू जर्सी (New Jersey) येथील हे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. (The boy accidentally ordered furniture worth Rs 1.4 lakh from his mother's phone). 

चुकून झाली खरेदी 

लक्षणीय बाब म्हणजे केवळ २२ महिन्यांचा अयांश कुमार (Ayaansh Kumar) अजूनही आई-वडीलांच्या मदतीशिवाय बाहेर जाऊ शकत नाही. परंतु या चिमुकल्याने $२,००० म्हणजेच भारतीय रकमेनुसार १.४ लाख रूपयांच्या किमतीचे फर्निचर ऑनलाइन ऑर्डर केले आहे. पण हे काम त्याच्या पालकांनी त्याला सोपवलेलं नव्हते. तर अयांशची आई मधु यांनी त्यांच्या फोनवर वॉलमार्टची वेबसाइट (Walmart's Website) ब्राउझ केल्यानंतर त्यांच्या शॉपिंग कार्टमध्ये भरपूर सामान ठेवले होते तेव्हा ही अयांश कडून अपघाताने खरेदी झाली.

अधिक वाचा : भाजप आमदाराच्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू

माहितीनुसार, अयांशच्या आईला त्यांच्या नवीन घरासाठी फक्त काही वस्तू घ्यायच्या होत्या. परंतु त्यांच्या मुलाचे नशीबच म्हणावे लागेल, कारण कार्टमधील सर्व वस्तू एका मोठ्या ऑनलाइन खरेदीमध्ये यशस्वीरित्या तपासल्या गेल्या होत्या. "त्याने हे केले आहे यावर विश्वास ठेवणे खरोखर कठीण आहे, परंतु हे असेच घडले आहे असे अयांशचे वडील प्रमोद कुमार यांनी म्हटले. नवीन फर्निचरचे बॉक्स एकामागून एक त्यांच्या घरच्या पत्त्यावर पोहोचू लागल्याने पालक आश्चर्यचकित झाले होते.

दरम्यान, काही पॅकेजेस इतके मोठे होते की ते दरवाजातून आत घेता नव्हते. मात्र जेव्हा अयांशच्या आईने आपले वॉलमार्ट अकाउंट तपासले तेव्हा त्यांना कळले की त्यांच्या मुलाने खुर्च्या, फ्लॉवर स्टँड आणि इतर अनेक गोष्टींची ऑर्डर दिली आहे ज्याची त्यांना गरज देखील नाही. तो खूप लहान आहे, "तो खूप गोंडस आहे, आम्ही हसत होतो की त्याने हे सर्व सामान ऑर्डर केले" असे अयांशच्या आईने म्हटले. 

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, त्या वेबसाइटचे अधिकारी आणि मुलांचे पालक त्यांच्याकडे आणि त्यांच्या मोठ्या भावंडांकडे अधिक बारीक लक्ष देतील, जे सर्व ऑनलाइन गोष्टी ब्राउझ करण्यासाठी फोन वापरतात. त्या चिमुकल्याते वडील प्रमोद म्हणाले की ते इथून पुढे त्यांच्या डिव्हाइसवर पासवर्ड आणि चेहऱ्यावरील ओळख तपासणाऱ्या लॉकचा उपयोग करतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी