Viral: शौक बडी चीज है! लग्नात नवरीने घातला चक्क २४ कॅरेट सोन्याचा ड्रेस; सोन्याच्या गाऊनने वेधले सर्वांचे लक्ष 

व्हायरल झालं जी
Updated May 05, 2022 | 15:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Viral News In Marathi | हौस पूर्ण करण्यासाठी कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. काही लोकांची हौस पूर्ण होते, तर काही लोकांची हौस अपूर्ण राहते. सध्या अशाच एका हौसीच्या प्रकरमाचा फोटो सोशल मीडायवर धुमाकूळ घालत आहे.

The bride wore a 24 carat gold dress at the wedding
लग्नात नवरीने घातला चक्क २४ कॅरेट सोन्याचा ड्रेस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा अंदाज लावणे देखील खूप कठीण आहे
  • लग्नात नवरीने घातला चक्क २४ कॅरेट सोन्याचा ड्रेस.
  • नवरीच्या सोन्याच्या गाऊनने वेधले सर्वांचे लक्ष.

Viral News In Marathi | मुंबई : हौस पूर्ण करण्यासाठी कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. काही लोकांची हौस पूर्ण होते, तर काही लोकांची हौस अपूर्ण राहते. सध्या अशाच एका हौसीच्या प्रकरणाचा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. कारण या नवरीच्या हौसेबद्दल जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. कारण एका नवरीने तिच्या लग्नात २४ कॅरेट सोन्याचा ड्रेस परिधान केला आहे. जेव्हा ही नवरी हा सोन्याचा ड्रेस घालून निघाली तेव्हा तिच्या गाऊनने लोकांचे लक्ष वेधले. (The bride wore a 24 carat gold dress at the wedding). 

अधिक वाचा : अमरावतीत शिवसेना भवनाची आत घुसून तोडफोड

दरम्यान, या महिलेचे नाव कायला असे आहे. नुकतेच कायलाचे लग्न झाले, ज्यामध्ये तिने २४ कॅरेटच्या सोन्याचा गाऊन परिधान केला होता. ती दिसायला खूप सुंदर दिसत होती. प्रत्येकाची इच्छा असते की त्यांचे लग्न सर्वात खास आणि वेगळे असावे. खासकरून मुली त्यांच्या ड्रेसबद्दल खूप विचार करत असतात. यासाठी त्या खूप पैसाही खर्च करतात. दरम्यान आपणही लग्नात खूप छान ड्रेस घालावा अशी कायलाची इच्छा होती. यासाठी तिच्या सासूबाईंनीही तिला खूप प्रेरणा दिली. नवरदेवाची आई, लिंडाने, तिच्या सुनेला ब्लिंग-आउट गाउनमध्ये चालण्यासाठी कपडे घातले.

नवरीने घातला सोन्याचा ड्रेस 

हा ड्रेस डिझायनर सौंद्रा सीलीने डिझाईन केला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याआधी सौंद्रानेही असे कपडे तयार केले नव्हते. पण जेव्हा तिला सोन्याचा गाऊन बनवण्याची ऑर्डर मिळाली तेव्हा तिने ते आव्हान म्हणून स्वीकारले आणि तो तयार केला. हा ड्रेस तयार करण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली असल्याची माहिती सौंद्राने दिली. दरम्यान नवरी ड्रेस घालून बाहेर पडते तेव्हा सर्वजण पाहतच राहिले. त्याचा फोटोही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. दरम्यान या फोटोंवरून सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. काही युजर्स या नवरीला हास्यास्पट कमेंट करून सल्ले देत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी