लग्नातील 'ते' सत्य कळताच रात्रीतच परतली वधू पक्षाची मंडळी, वेळ न घेता मोडलं लग्न

व्हायरल झालं जी
Updated May 30, 2021 | 13:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

बिहारच्या सिवानमधून एक असा प्रकार समोर आला आहे जिथे एका लग्नसोहळ्याच्या वेळी एक असा वाद समोर आला ज्यामुळे वधूपक्षाने लग्नच मोडले. यानंतर लग्नासाठी आलेल्या वऱ्हाड्यांना बांधून ठेवले गेले. जाणून घ्या प्रकरण.

Marriage ceremony
वधू पक्षाला 'ती' गोष्ट माहिती होताच मोडलं लग्न  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • बिहारच्या सिवानमध्ये लग्नादरम्यान झाला मोठा वाद
  • गावकऱ्यांनी वऱ्हाड्यांना बनवले बंधक, पंचांनी सोडवले प्रकरण
  • दागिन्यांवरून झाला होता वाद, एका रात्रीत पळाले वऱ्हाडी

सिवान: बिहारच्या (Bihar) सिवान जिल्ह्याच्या तरवारा भागात गुरुवारी एक लग्नसोहळा (marriage ceremony) सुरू होता. यादरम्यान वधूपक्षाने (bride side) वरात आल्यावर वऱ्हाड्यांचे जोरदार स्वागत (welcome) केले आणि त्यांची उत्तम बडदास्त (hospitality) ठेवली. यानंतर मात्र असे काही घडले ज्याची कल्पनाही (imagination) कोणी केली नव्हती. लग्नादरम्यानच वधू (bride) आणि वरपक्षादरम्यान (bridegroom) एक असा वाद (dispute) उत्पन्न झाला ज्यामुळे हे लग्न मोडले (marriage broke) आणि वऱ्हाडी (guests) कसेतरी पळत आपल्या घरी पोहोचले. (Such a quarrel took place during the marriage that guests went straight back)

खऱ्या आणि खोट्या दागिन्यांवरून झाला वाद

दैनिक जागरणच्या बातमीनुसार चाचोपाली गावात सतवार या गावातून वरात आली होती. लग्नादरम्यान खऱ्या आणि खोट्या दागिन्यांवरून वर आणि वधूपक्षात वाद झाला. बातमीनुसार वरपक्षाने वधूला दिलेल्या दागिन्यांमध्ये काही खोटे दागिनेही घातले होते. यानंतर वधूपक्ष भडकला आणि त्यांनी लग्न करण्यास नकार दिला आणि वराकडच्या लोकांसह अनेक वऱ्हाड्यांना बंधक बनवले.

लग्नादरम्यान हुंड्यावरून पेटला वाद

बातमीनुसार अभिषेक कुमार नावाच्या या वराच्या लग्नात हुंडा म्हणून एक लाख रुपये रोख आणि बाईक देण्याचे ठरले होते. तर वराच्या पित्याकडून लग्नात 90 हजार रुपयांचे दागिने देण्याचे ठरले होते, पण त्यांनी 900 रुपयांचे खोटे दागिने दिले. यानंतर वाद वाढला तेव्हा वधूपक्षाने हुंड्यात ठरलेली बाईक देण्यास नकार दिला.

वाद वाढल्यानंतर बसली पंचायत

यानंतर गावातल्या लोकांनी वरासोबत अर्धा डझन लोकांना बांधून ठेवले. अनेक वऱ्हाडी एका रात्रीत पळून गेले. यानंतर गावाचे प्रमुख आणि इतर वरिष्ठ लोक तिथे पोहोचले आणि त्यांनी हा वाद कसातरी सोडवला. यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांचे सामान आणि हुंडा परत देण्याचे ठरले आणि या विवादातून तोडगा निघाला. हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचून पुढे होणारा मनस्ताप वाचला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी