Viral Video: ऐकावं ते नवलच! श्रद्धांजली सभेत डान्सरने धरला फिल्मी गाण्यावर ठेका, पाहा व्हिडीओ

व्हायरल झालं जी
Updated May 14, 2022 | 09:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Funny Video । एखाद्याचा मृत्यू झाला की आजूबाजूला तसेच घरातील लोक दु:खी होतात. अनेक ठिकाणी भयान शांतता पसरते. पण असे क्वचितच झाले असेल की एखाद्याच्या मृत्यूवर आनंद साजरा केला जात आहे.

The dancers danced to a film song at the tribute meeting
श्रद्धांजली सभेत डान्सरने धरला फिल्मी गाण्यावर ठेका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा अंदाज लावणे देखील खूप कठीण आहे
  • सध्या श्रद्धांजली सभेत डान्सरने फिल्मी गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
  • हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर 'memer__king' या आयडीने शेअर केला आहे.

Funny Video । मुंबई : एखाद्याचा मृत्यू झाला की आजूबाजूला तसेच घरातील लोक दु:खी होतात. अनेक ठिकाणी भयान शांतता पसरते. पण असे क्वचितच झाले असेल की एखाद्याच्या मृत्यूवर आनंद साजरा केला जात आहे. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये चक्क श्रद्धांजली सभेला एका नटीने भन्नाट डान्स केला आहे. सध्या हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत असून नेटकरी याला हास्यास्पद कमेंट करत आहेत. (The dancers danced to a film song at the tribute meeting). 

अधिक वाचा : पंजाबविरूद्धच्या पराभवानंतर RCB चा कसा असेल प्लेऑफचा मार्ग?

दरम्यान, तुम्ही सर्वांनी बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट 'गँग्स ऑफ वासेपूर' पाहिला असेल. ज्यामध्ये आज्जीच्या निधनावर नृत्य सभेचे आयोजन केले जाते. खर तर खऱ्या जीवनातही असेच काहीसे घडले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका आज्जीच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये एक डान्सर जबरदस्त डान्स करत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही सलमान खानच्या चित्रपटातील गाणे 'ले ले मजा ले' बॅकग्राउंडमध्ये वाजत असून डान्सर ग्लॅमरस स्टाईलमध्ये नाचत असल्याचे पाहायला मिळत आहे. लक्षणीय बाब म्हणजे तिथे बसलेली लोक देखील या डान्सचा खूप आनंद घेत आहेत. 

श्रद्धांजली सभेत भन्नाट डान्स 

व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल असेल. तुम्ही विचार करत असाल की हे नक्की काय प्रकरण आहे? हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरील युजर्सही थक्क झाले आहेत आणि भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर 'memer__king' या आयडीने शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर २ लाख ८४ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईक केले आहे. एका युजरने व्हिडीओवर लिहिले की, "सभा आयोजित करणारी मंडळी आज्जी गेल्या म्हणून आनंदी आहे की दु:खी आहे हेच कळत नाहीये."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी