Viral Video: कुत्र्याने जंगलाच्या राजा राणीवरच केला हल्ला; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

व्हायरल झालं जी
Updated Apr 11, 2022 | 12:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dog Barking on Lion । अनेकदा सिंहाला पाहून जंगलातील सर्वच पाण्यांना घाम फुटतो, सिंहाला पाहून सर्वच वन्यप्राणी आपला जीव वाचवण्यासाठी इतरत्र धाव घेतात. मात्र यावेळी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या कुत्र्याचा व्हिडिओ या सर्व गोष्टींना अपवाद ठरत आहे.

The dog attacked the king and queen of the forest You too will be shocked to see the video
कुत्र्याने जंगलाच्या राजा राणीवरच केला हल्ला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • चक्क कुत्र्याने केला जंगलाच्या राजा राणीवर हल्ला.
  • व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सिंह आणि सिंहीणी दोघेही आरामात बसले आहेत.
  • हा व्हिडिओ IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.

Dog Barking on Lion । मुंबई : अनेकदा सिंहाला पाहून जंगलातील सर्वच पाण्यांना घाम फुटतो, सिंहाला पाहून सर्वच वन्यप्राणी आपला जीव वाचवण्यासाठी इतरत्र धाव घेतात. मात्र यावेळी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या कुत्र्याचा व्हिडिओ या सर्व गोष्टींना अपवाद ठरत आहे. कारण व्हिडिओत दिसणारा कुत्रा सिंहाला न घाबरता त्यांच्या तोंडावर भुंकत आहे. व्हिडिओमध्ये सिंहासोबत सिंहिण देखील दिसत आहे, कुत्र्याने जंगलाच्या राजा राणीवरच केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (The dog attacked the king and queen of the forest You too will be shocked to see the video). 

अधिक वाचा : शिवकुमार सुब्रमण्यम यांचे निधन

कुत्र्याची ही हिम्मत पाहून तुम्ही त्याची स्तुती करू शकता किंवा त्याच्या या कृतीवर हसूही शकाल. लक्षणीय बाब म्हणजे कुत्र्याचे कौतुकही केले जाते आहे कारण तो न घाबरता जंगलाच्या राजाला टक्कर देत आहे. त्याची ही कृती पाहून जंगलाचे राजा राणी देखील चकीत झाले आहेत. हास्यास्पद बाब म्हणजे सिंहाचे मन थोडेही बिघडले तर कुत्र्याचा खेळ समाप्त होणार हे नक्की. व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. 

कुत्र्याच्या धाडसाने सिंह-सिंहिणी चकित

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सिंह आणि सिंहिणी दोघेही आरामात बसले आहेत, त्याच दरम्यान एक जखमी कुत्रा त्यांच्या दिशेने धावून आला. तेवढ्यात ताबडतोब सिंह आणि सिंहिणी त्याच्याकडे धावतात, परंतु कुत्रा त्यांच्या दिशेने धावत असताना भुंकायला लागतो. तो एकदा वळतो आणि परत जातो, पण नंतर परत येतो आणि भुंकायला लागतो. एकदा तो जंगलाचा राजा सिंहालाही पळायला लावतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंह आणि सिंहिणी कुत्र्याच्या सर्व कृतींमध्ये आरामशीर असतात.

लोक म्हणाले - कुत्रा भाग्यवान आहे

हा व्हिडिओ IFS अधिकारी सुसंता नंदा (Susanta Nanda IFS) यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. जवळपास ९ हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर शेकडो लोकांनी तो रिट्विटही केला आहे. एवढेच नाही तर लोकांनी यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, सिंहाचा मूड चांगला आहे असे दिसते. दुसर्‍या यूजरने लिहिले की, कुत्र्याने दारू प्यायली आहे, अन्यथा त्याने असे केले नसते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी