Desi Jugaad: या जुगाडासमोर इंजिनीअरही होईल फेल; चक्क रिकाम्या ड्रमपासून बनवले वॉशिंग मशीन

व्हायरल झालं जी
Updated Jan 08, 2022 | 15:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Desi Jugaad | पूर्वीच्या काळात सर्वत्र हातानेच कपडे धुण्याचा प्रकार होता. मात्र कालांतराने हे काम सोपे करण्यासाठी वॉशिंग मशीन आले. लोक त्यांचे खराब कपडे वॉशिंग मशिनमध्ये टाकतात आणि नंतर कोणतेही प्रयत्न न करता ते मशीन कपडे आपोआप स्वच्छ करून देते.

The engineer will also fail in front of this washing machine made from a very empty drum
या जुगाडासमोर इंजिनीअरही होईल फेल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्यांच्याकडे वॉशिंग मशीन नाही त्यांना आता कपडे धुण्यासाठी नवा जुगाड सापडला आहे.
  • सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने खराब कपडे धुण्यासाठी गावठी जुगाडातून चक्क ड्रमपासून वॉशिंग मशीन बनवल्याचे दिसून येते.
  • हा व्हिडिओ आतापर्यंत ३९ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

Desi Jugaad | नवी दिल्ली : पूर्वीच्या काळात सर्वत्र हातानेच कपडे धुण्याचा प्रकार होता. मात्र कालांतराने हे काम सोपे करण्यासाठी वॉशिंग मशीन (Washing Machine) आले. लोक त्यांचे खराब कपडे वॉशिंग मशिनमध्ये टाकतात आणि नंतर कोणतेही प्रयत्न न करता ते मशीन कपडे आपोआप स्वच्छ करून देते. दरम्यान, बहुतांश ठिकाणी आजही असे काही लोक आहेत ज्यांच्याकडे मशीन नाही आणि ते हाताने कपडे धुतात. त्याचबरोबर काही लोक असे देखील आहेत की ज्यांच्याकडे वॉशिंग मशीन नाही, पण त्यांना कपडे धुण्यासाठी जुगाड सापडला आहे. लक्षणीय बाब म्हणजे सध्या अशाच एका जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तर हा जुगाड पाहून चक्क इंजिनीअरही (Engineer) फेल होईल. (The engineer will also fail in front of this washing machine made from a very empty drum). 

जुगाडातून बनवले वॉशिंग मशीन

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) झालेल्या या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने खराब कपडे धुण्यासाठी गावठी जुगाडातून (Desi Jugaad) चक्क ड्रमपासून वॉशिंग मशीन बनवल्याचे दिसून येते. हा जुगाड पाहिल्यानंतर सर्वाच्यांच मनात येईल की या जुगाडासमोर मोठ मोठे इंजिनीअरही फेल झाले आहेत. व्हिडीओ दिसत असलेल्या या निळ्या रंगाच्या ड्रमचा (Drum) वापर पाणी साठवण्यासाठी केला जातो. मात्र त्या व्यक्तीने जुगाड करून वॉशिंग मशीन बनवले. जुगाड करणाऱ्या व्यक्तीने ड्रममधील इलेक्ट्रिक मोटरचा वापर करून ते यंत्र बनवले आहे.

लक्षणीय बाब म्हणजे वॉशिंग मशीन बनवणाऱ्या व्यक्तीचा जुगाड पाहिल्यानंतर सर्वच जण विचारात पडतील यात काही शंका नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला ते पाहताच क्षणी आश्चर्यचकित झाले. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram) the.funny.us या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आणि विचित्र प्रतिक्रिया आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे हा व्हिडिओ आतापर्यंत ३९ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी