Viral News In Marathi | मुंबई : या जगात कोणाचे नशीब कधी चमकेल याची कोणी कल्पना देखील करू शकत नाही. काही माणसं क्षणातच देशोधडीला लागतात, तर काही लोक आयुष्यभर कष्ट करत राहतात, तरीही त्यांचे नशीब बदलत नाही. पण एका २९ वर्षीय तरुणीने केलेल्या पराक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. ही मुलगी केवळ करोडपतीच नाही तर वर्षाला तीन कोटी रुपये कमावते आहे. दरम्यान तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की ही मुलगी नक्की कोणते काम करते, ज्यातून ती एवढी कमाई करते? चला तर म जाणून घेऊया या महिलेच्या कामाबद्दल. (The girl became a millionaire only at the age of 29).
अधिक वाचा : पंजाबच्या पटियालात खलिस्तानवादी आणि शिवसैनिकांमध्ये राडा
अलेक्झांड्रा फासुलो असे या २९ वर्षीय तरुणीचे नाव आहे. तिने सांगितले की ती एकाच वेळी ६ सेक्टरमध्ये काम करते, ज्यातून ती वर्षाला करोडो रुपये कमावते. एका मुलाखतीत अलेक्झांड्राने सांगितले की, गेल्यावर्षी तिने फ्रिलान्स लेखन, इंफ्लूएंसर स्पॉन्सरशिप, ईबुक सेल्स, कोर्स सेल्स, जाहिरात महसूल आणि एफिलिएट महसूलाचे काम करून एका वर्षात तीन कोटींहून अधिकची कमाई केली होती. एवढेच नाही तर तिने आतापर्यंत तीन घरे खरेदी केली आहेत. अलेक्झांड्रा म्हणते की, २०१८ मध्ये तिने Fiverr वर फ्रीलान्स लेखन आणि इतर काही काम करून २० मिलियनहून जास्त पैसे कमावले आहेत.
अलेक्झांड्रा क्लायंटसाठी ब्लॉग, प्रेस रिलीज आणि वेबसाइट संबंधित साहित्याचे लेखन करते. हे सर्व काम तिला Fiverr Pro वेबसाइटद्वारे मिळते. सध्या ती बचत आणि गुंतवणुकीवर जास्त भर देत असल्याचे तिचे म्हणणे आहे. "माझी फ्लोरिडामध्ये तीन घरांची संपत्ती आहे, ज्यांची एकूण किंमत ९ कोटींपेक्षा जास्त आहे. इतकेच नाही तर मी माझ्या कमाईतील एका मोठ्या भागाची बचत करते कारण मी प्रत्येक वेळी एवढी रक्कम कमवू शकणार नाही." असे तिने आणखी सांगितले. याशिवाय अलेक्झांड्रा इंन्स्टाग्रामवरही खूप सक्रिय आहे. तिला दीड लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.