Viral: आरारा खतरनाक! मुलीने बॉयफ्रेंड निवडण्यासाठी एकाच ठिकाणी बोलावले ६ 'आशिक', बनवला हा भन्नाट प्लॅन

व्हायरल झालं जी
Updated May 31, 2022 | 15:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shocking News In Marathi | हे जग विचित्र गोष्टींनी भरलेले आहे या विचित्र गोष्टी जगाची शोभा वाढवतात तर काही अशा गोष्टी सर्वांचे मनोरंजन करत असतात. या कलियुगात कधी काय पाहायला, ऐकायला मिळेल याची कोणीच कल्पना करू शकत नाही.

The girl called 6 boys in one place for boyfriend selection
मुलीने बॉयफ्रेंड निवडण्यासाठी एकाच ठिकाणी बोलावले ६ 'आशिक'  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • काही विचित्र गोष्टी जगाची शोभा वाढवतात तर काही अशा गोष्टी सर्वांचे मनोरंजन करत असतात.
  • मुलीने बॉयफ्रेंड निवडण्यासाठी एकाच ठिकाणी बोलावले ६ 'आशिक'.
  • स्वीडनच्या या १९ वर्षीय तरुणीचे नाव आहे फॅनी ब्लूम असे आहे.

Shocking News In Marathi | नवी दिल्ली : हे जग विचित्र गोष्टींनी भरलेले आहे या विचित्र गोष्टी जगाची शोभा वाढवतात तर काही अशा गोष्टी सर्वांचे मनोरंजन करत असतात. या कलियुगात कधी काय पाहायला, ऐकायला मिळेल याची कोणीच कल्पना करू शकत नाही. सध्या असाच एक प्रकार सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एका मुलीने बॉयफ्रेंड निवडण्यासाठी एक अनोखी पद्धत अवलंबली आहे. मुलीने एकाच वेळी ६ आशिक एकाच ठिकाणी बोलावले. जेणेकरून ती तिच्यासाठी कोण योग्य आहे हे शोधू शकेल. लक्षणीय बाब म्हणजे ठरल्याप्रमाणे सर्व आशिक एकाचवेळी एकाच जागी पोहचले. (The girl called 6 boys in one place for boyfriend selection). 

अधिक वाचा : 12 नापास पोरगं बनलं IAS ऑफिसर

दरम्यान, स्वीडनच्या या १९ वर्षीय तरुणीचे नाव आहे फॅनी ब्लूम असे आहे. काही काळापासून ती डेटिंग साइटवर ६ मुलांना डेट करत होती. पण तिला समजू शकले नाही की तिच्यासाठी कोण एकदम परफेक्ट आहे? म्हणून फॅनीने एक भन्नाट योजना आखली. खोट्या वाढदिवसाच्या बहाण्याने तिने त्या सर्व मुलांना एकत्र बोलावले. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे तिने ही गोष्ट कोणाला कळू देखील दिली नाही आणि सर्व मुलं एकत्र येऊन वाढदिवस साजरा करायला आली. यादरम्यान फॅनीने हे देखील लक्षात घेतले की ही सर्व मुले फॅनीचे टिंडरवरून मॅच होत आहेत.

आखली भन्नाट योजना

फॅनीने सांगितले की तिचा खरा वाढदिवसही येणार होता, त्यामुळे तिने तिच्या खोट्या वाढदिवसाला सर्वांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला. काही मुलांनी तिच्यासाठी काही भेटवस्तूही आणल्या होत्या. तर एक जण फुले घेऊन आला होता. फॅनीने सांगितले की, बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने ती एक-एक करून सर्वांना भेटली. पण फॅनीने प्लॅन बनवला आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. मात्र असे करणे सोपे काम नव्हते, असे फॅनीचे म्हणणे आहे. आता हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले असून लोक आपापल्या स्टाईलमध्ये या फॅनीच्या स्टाईलची फिरकी घेत आहेत. दरम्यान फॅनीच्या या भन्नाट प्लॅनची सर्वत्र चर्चा होत आहे. तर काही लोक तिच्या धाडसाचे कौतुक देखील करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी