Viral Video: धक्कादायक! ट्रेनच्या रूळावर बसून फोनवर बोलत होती मुलगी; तेवढ्यात अंगावरून गेली ट्रेन

Shocking | आयुष्यात अनेक वेळा आपण इतके बेफिकीर बनतो की आपण आपल्या आयुष्याची देखील काळजी घेत नाही. असे व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत असतात. आजही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल.

The girl was sitting on the train tracks and talking on the phone Just then the train passed by
ट्रेनच्या रूळावर फोनवर बोलत असताना अंगावरून गेली ट्रेन   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ट्रेनच्या रूळावर फोनवर बोलत असताना तरूणीच्या अंगावरून ट्रेन गेली.
  • हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी @ipskabra नावाच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.

Shocking | मुंबई : आयुष्यात अनेक वेळा आपण इतके बेफिकीर बनतो की आपण आपल्या आयुष्याची देखील काळजी घेत नाही. असे व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत असतात. आजही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. मात्र हा व्हिडिओ किती खरा आहे याबाबत आम्ही पुष्टी करू शकत नाही. (The girl was sitting on the train tracks and talking on the phone Just then the train passed by). 

अधिक वाचा : पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता लवकरच जमा होणार

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी रेल्वेच्या रूळावर आरामात बसून फोनवर बोलत असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात अचानक ट्रेन येते आणि मुलीच्या अंगावरून जाते. महत्त्वाचे म्हणजे त्या संबंधित तरूणीला समजत देखील नाही की कधी ट्रेन येते आणि जाते. ट्रेन आल्यावर ती रूळावर झोपते त्यामुळे कोणतीही दुर्घटना होत नाही. 

इथे पाहा व्हिडिओ 

व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी कशी कशाचीही चिंता न करता फोनवर बोलताना दिसत आहे. लक्षणीय बाब म्हणजे ट्रेन निघून गेल्यावरही ती थांबत नाही ती तिचे बोलणे चालूच ठेवते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील युजर्स चांगलेच संतापले आहेत. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. या मुलीला तिच्या जीवाची पर्वा नाही असे लोक म्हणत आहेत.

लक्षणीय बाब म्हणजे हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी @ipskabra नावाच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. याला आतापर्यंत ७५ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. एका युजरने रागाने म्हटले की, "ती काय मरायला गेली होती का? की कॉल येताच डोकं बदलले. तर काही युजर्संनी दिला मेडल दिले जावे असे हास्यास्पद म्हटले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी