VIDEO: उतावळ्या नवरदेवाने लग्नात केली अंधाधुंद फायरिंग; लष्करातील जवानाचा दुर्दैवी मृत्यू 

व्हायरल झालं जी
Updated Jun 24, 2022 | 11:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Groom Fired Army Jawan Died । उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनभद्र जिल्ह्यातील रॉबर्टसगंज कोतवाली परिसरात मंगळवारी रात्री एका लग्न समारंभात झालेल्या जोरदार गोळीबारात लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे.

The Groom Fired fired indiscriminately at his own wedding, The unfortunate death of an army soldier
नवरदेवाने केलेल्या अंधाधुंद फायरिंगमध्ये जवानाचा मृत्यू   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नवरदेवाने केलेल्या अंधाधुंद फायरिंगमध्ये जवानाचा मृत्यू.
  • उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना.
  • लष्करातील जवान बाबूलाल यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Groom Fired Army Jawan Died । मुंबई : उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनभद्र जिल्ह्यातील रॉबर्टसगंज कोतवाली परिसरात मंगळवारी रात्री एका लग्न समारंभात झालेल्या जोरदार गोळीबारात लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा गोळीबार स्वतः नवरदेवानेच केला होता. याप्रकरणी बुधवारी पोलिसांनी आरोपी नवरदेवाला अटक केली. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (The Groom Fired fired indiscriminately at his own wedding, The unfortunate death of an army soldier). 

अधिक वाचा : फक्त २ मिनिटात येईल गाढ झोप, जाणून घ्या खास युक्ती

नवरदेवाने लग्नात केला अंधाधुंद गोळीबार 

दरम्यान, व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही उतावळ्या नवरदेवाला त्याच्या लग्नात फायरिंग करताना पाहू शकता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरदेव मनीष मधेशीया आपल्या लग्नाबद्दल इतका उत्साही होता की, मिरवणुकीत त्याने पिस्तुल काढून फायरिंग करण्यास सुरूवात केली. त्यातून निघालेली गोळी सैन्यात शिपाई असलेल्या त्याच्याच मित्राला लागली. यामुळे लष्करातील जवान बाबूलाल यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणखी आश्चर्याची बाब म्हणजे ज्या पिस्तुलाने गोळी झाडण्यात आली ती पिस्तूल मृत लष्करी जवान बाबूलाल यांचीच होती.

माहितीनुसार, रॉबर्टसगंज कोतवाली भागातील ब्राह्मणनगर येथील गेस्ट हाऊसमध्ये मंगळवारी मनीष मधेशियाचे लग्न होणार होते. या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी त्यांचे मित्र आणि सैन्य दलातील शिपाई बाबुलाल यादव आले होते. सजवलेल्या मिरवणुकीने नवरदेव गेस्ट हाऊसकडे रवाना झाला होता. त्याच्यासोबत लग्नातील अनेक मान्यवर देखील उपस्थित होते. यादरम्यान नवरदेवाचा आपल्या लग्नाबद्दल इतका उत्साह वाढला की तो वॅगनवर उभा राहिला आणि पिस्तुलाने आनंदाने गोळीबार करू लागला. या पिस्तुलातून सुटलेली गोळी त्याचा मित्र बाबुलाल यादव याच्या अंगावर गेली. 

गोळी लागल्याने लष्करातील जवानाचा दुर्दैवी मृत्यू

गोळी लागल्याने बाबूलाल यादव गंभीर जखमी झाले. यानंतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्यांना तातडीने जिल्हा इस्पितळात नेले. मात्र जिल्हा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांनी प्राण गमवावे आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गोळीबाराच्या घटनेनंतर लग्नाचा आनंद क्षणात शोकात बदलला. गोळीबारात लष्करातील जवान बाबूलाल यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील सदस्यांची अवस्था वाईट आहे. बाबूलाल हे त्यांच्या कुटुंबाचे एकमेव आधार होते. यानंतर जवानाच्या कुटुंबीयांच्या वतीने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आता आरोपी वराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी