छोट्या मुलानं जबरदस्त स्टाईलमध्ये कॉपी केला Allu Arjun चा डायलॉग, Video ने उचवली धमाल

little Boy copied Allu Arjun dialogue : सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. कारण हा व्हिडिओ एका लहान मुलाचा आहे. जो पुष्पा स्टाईलमध्ये स्वॅग दाखवत आहे.

The little boy copied Allu Arjun's dialogue in a great style
छोट्या मुलानं जबरदस्त स्टाईलमध्ये कॉपी केला Allu Arjun चा डायलॉग, Video ने उचवली धमाल ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ‘पुष्पा’ या चित्रपटातील गाणी आणि संवादांनी लोकांवर जादू केली आहे.
  • अल्लू अर्जुनचे डायलॉग्स लहान मुलाने जबरदस्त स्टाइलमध्ये कॉपी केले
  • व्हिडिओने खळबळ उडवून दिली

मुंबई : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाचा उत्साह अजूनही लोकांच्या मनातून उतलेला नाही. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून, त्यातील गाणी आणि संवादांनी लोकांच्या हृदयावर आणि मनावर अशी जादू निर्माण केली आहे की प्रत्येकजण चित्रपटाच्या गाण्यांवर आणि संवादांवर रील बनवत आहे आणि सोशल मीडियावर शेअर करत आहे. (The little boy copied Allu Arjun's dialogue in a great style)

अधिक वाचा : Pushpa Movie: "पुष्पा राज अपुन लिखेगा नही साला', १० वीच्या विद्यार्थ्याने चक्क उत्तरपत्रिकेत लिहला डायलॉग 

अगदी लग्न असो किंवा पार्टी, सगळीकडे लोक श्रीवल्ली गाण्यावर नाचताना दिसतात. त्याच वेळी, आता सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण हा व्हिडिओ एका लहान मुलाचा आहे. जो पुष्पा स्टाईलमध्ये स्वॅग दाखवत आहे. मुलाचा जबरदस्त अभिनय पाहून लोक त्याचे चाहते झाले आहेत. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

अधिक वाचा :  ​Viral News: धक्कादायक! एड्सबाधित काकीने रचला कट; अल्पवयीन पुतण्याशी ठेवले शारिरीक संबंध

हा व्हिडिओ hitesh_nayak.99 नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, लोकांना तो खूप आवडला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 35 लाख लोकांनी लाईक केले आहे. तो एक कोटीहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओवर लोकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, 'पुष्पाच्या बालपणीची भूमिका करण्यासाठी मी दिग्दर्शकाशी बोलले पाहिजे.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी