जंगलातल्या प्राण्यांवरही चालली म्युझिकची जादू, वाद्याचा सूर ऐकायला तरुणीभोवती गर्दी

एका मुलीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती व्हायलीन वाद्य वाजवत आहे आणि वन्य प्राणी प्रेमाने तिच्याकडे सरकत आहेत.

The magic of music also played on the animals of the forest, the crowd around the young woman to play the tune of violin
जंगलातल्या प्राण्यांवरही चालली म्युझिकची जादू, वाद्याच्या सूर ऐकायला तरुणीभोवती गर्दी  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • संगीत ही थेरपी म्हणून काम करते.
  • एखाद्याला रडवू शकते किंवा एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते
  • एका मुलीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती आपले वाद्य वाजवत आहे आणि वन्य प्राणी प्रेमाने तिच्याजवळ येत आहेत. 

मुंबई : संगीतामध्ये मनामध्ये खोलवर रुतलेल्या भावना बाहेर आणण्याची ताकद आहे. हे एक जादूचे औषध आहे कारण ते एखाद्याला रडवू शकते किंवा एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते आणि बरेच लोक उदास किंवा तणावग्रस्त असताना त्यांना आधार देण्याचे काम संगीत करीत असते. (The magic of music also played on the animals of the forest, the crowd around the young woman to play the tune of violin)

असे म्हणतात की संगीत प्रत्येकाला जीवन देते. जेव्हा जेव्हा आपले मन दुःखी असते तेव्हा आपण एखादे गाणे रचतो किंवा दुसरे काही वाद्य ऐकतो आणि मन फुलून जाते असे अनेकवेळा दिसून येते. मूड बदलतो. एखादी व्यक्ती त्या सर्व गोष्टी विसरते ज्याचा तो काही काळासाठी त्रास देत होता. म्हणूनच संगीत ही थेरपी म्हणून काम करते. पण संगीतामुळे वन्य प्राण्यांनाही दिलासा मिळाला आहे आणि तेही संगीत ऐकायला आले आहेत, असे तुम्ही कधी ऐकले किंवा पाहिले आहे का. नुकताच एका मुलीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती आपले वाद्य वाजवत आहे आणि वन्य प्राणी प्रेमाने तिच्याजवळ येत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Diana (@chelodiana)

या व्हिडिओमध्ये, एक तरुणी जंगलात बसली आहे, तिच्या खुर्चीसमोर सेलो (वाद्य) वाजवताना दिसत आहे. मग त्याच बाजूला वन्य प्राणी मागून येताना दिसतात. व्हिडिओ पाहून असं वाटतंय की त्याला ही धून खूप आवडतेय.

दिसायला ते दोघेही रेनडिअरसारखे दिसतात. माणसांपासून खूप दूर असलेला हा जंगली प्राणी जेव्हा हा सूर ऐकतो, तेव्हा तो हळूहळू पुढे सरकू लागतो. दोघेही रेनडिअर तरुणीच्या अगदी जवळ येतात आणि तिच्या कलेचा आनंद घेऊ लागतात.

या कलाकार तरुणीचे नाव डायना आहे. तिने इंस्टा बायोवर लिहिले आहे की ती स्पेनची आहे आणि सेलो वाजवते. ती तिचे व्हिडीओ इन्स्टावर शेअर करत असते. त्याने अनेक स्ट्रीट परफॉर्मन्सही दिले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी