Railway Station : भारतात (India)रेल्वेचं जाळ (Railway Transport)मोठ्या प्रमाणात आहे. ढोबळ अंदाज पकडला तर साधरण देशातील 99 टक्के लोक रेल्वेनं (Railway) प्रवास करतात. रेल्वेच्या जाळ्यात अनेक स्टेशन असे स्टेशन आहेत ज्याच्या नावामागे एक वेगळा इतिहास, एक वेगळी कथा जोडली गेली आहे. आज आपण अशाच एका मुंबईतील (Mumbai)स्टेशनविषयी जाणून घेणार आहोत. हे स्टेशन आहे मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन ( Masjid Bandar Railway Station). हे नाव का पडलं, यामागील काय इतिहास आहे हे जाणून घेऊ. (The name of a station in India is Masjid, what is the story behind the name)
अधिक वाचा : कांदा खरेदीबाबत बाजारात हस्तक्षेप करा- केंद्र सरकारचे निर्दश
मस्जिद रेल्वे स्टेशन हे दक्षिण मुंबई (मुंबई) विभागातील एक रेल्वे स्थानक आहे. हे रेल्वे स्टेशन 1877 पासून वाहतुकीसाठी सुरू करण्यात आले. या स्टेशनला मस्जिद हे नाव काय देण्यात आलं. असा प्रश्न तुम्ही केला असेल तर त्याचं उत्तर हे आहे की, हे स्टेशन मुस्लीम भागात आहे, त्यामुळे हे नाव देण्यात आले आहे असं काही जण सांगतात. त्याच्या जवळ एक मस्जिद बंदर पूल देखील आहे. बंदर हे सागरी वाहतुकीसाठी वापरलं जातं. तेथे माशांची वाहतूक केली जाते, आणि ते मांडवी विभागाचे स्टेशनचे आहे.
अधिक वाचा : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे शुभेच्छा संदेश
इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, या स्टेशनवर चार प्लॅटफॅार्म आहेत. या स्थानकाच्या आजूबाजूला घाऊक बाजार असल्याने येथे मोठी गर्दी असते. त्याच्या पूर्वेला लोह बाजार, पश्चिमेला डायमंड ट्रेडर्स मार्केट आहे. या स्टेशनवरून छत्रपती शिवाजी टर्मिनल स्टेशनला जाता येते. तसेच या स्टेशन जवळ ड्राय फ्रुट्सचे घाऊक बाजार मार्केट देखील आहे. तसंच थोडं पुढे गेल्यावर मुंबा देवी नावाचं एक प्राचीन मंदिर आहे जे मुंबईची ओळख आहे असं म्हटलं जातं. या मशिदीचे पूर्वी पूर्ण नाव मस्जिद बंदर होते पण आता तिचे नाव बदलून रेल्वे स्टेशन करण्यात आले आहे.
अधिक वाचा : आंतरराष्ट्रीय महिला दिन शुभेच्छा करा शेअर
1- बाप -हे रेल्वे स्टेशन राजस्थानच्या जोधपूरमध्ये आहे.
2- बेनाम रेल्वे स्टेशन - पश्चिम बंगालमधलं हे एक असं रेल्वे स्टेशन आहे ज्याचं नाव नाही.
3- अटारी स्टेशन - हे स्थानक इतर सर्व स्थानकांपेक्षा थोडे वेगळे आहे. हे भारतातील पहिले रेल्वे स्टेशन आहे जिथे जाण्यासाठी व्हिसा आवश्यक आहे. हे स्टेशन अमृतसरमध्ये आहे आणि भारत-पाकिस्तान सीमेवर असल्याने स्टेशनवर कडक सुरक्षा पाळत ठेवण्यात आली आहे.