Viral Video : विमान कोसळलं आणि रुळावर पडलं, तेवढ्यात समोरून आली ट्रेन; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Plane Crash Viral Video | विमान कोसळून झालेल्या अपघाताच्या घटना नेहमीच धक्कादायक असतात. मात्र काही घटना अशा देखील असतात की ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मात्र अशीच एक दुर्देवी घटना समोर आली आहे. सध्या अमेरिकेतील एका विमान अपघाताचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

The shocking video of a plane crash and falling on a railway track is going viral
विमान अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मेरिकेतील एका विमान अपघाताचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
  • वास्तविक ही घटना अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील आहे.
  • पायलटचे नशीब ट्रेन तिथे पोहोचण्याच्या एक सेकंद आधी अधिकाऱ्यांनी ट्रेनच्या पायलटला ओढले आणि तो ट्रेनच्या जीवघेण्या धोक्यापासून वाचला.

Plane Crash Viral Video | नवी दिल्ली : विमान कोसळून झालेल्या अपघाताच्या घटना नेहमीच धक्कादायक असतात. मात्र काही घटना अशा देखील असतात की ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मात्र अशीच एक दुर्देवी घटना समोर आली आहे. सध्या अमेरिकेतील एका विमान अपघाताचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका विमानाचा अपघात झाला आणि ते रेल्वे रुळावर पडले. दरम्यान झाले असे कि ट्रेन रुळावर आली आणि तिथे विमान कोसळले. एवढेच नाही तर त्या विमानाचा पायलट आरडाओरडा करताना शेवटच्या क्षणी तेथून खेचला गेला. वास्तविक ही घटना अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील (America California) आहे. माहितीनुसार, कॅलिफोर्नियातील पॅकोइमा येथून एका लहान विमानाने उड्डाण केले, परंतु काही तांत्रिक बिघाडामुळे ते टेक ऑफ करताच जवळच्या रेल्वे ट्रॅकवर कोसळले. धक्कादायक बाब म्हणजे विमान रेल्वे रुळाच्या अगदी मध्यभागी पडले. या घटनेची माहिती मिळताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. (The shocking video of a plane crash and falling on a railway track is going viral). 

 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकासह अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र घटनास्थळी पोहोचताच त्यांना रेल्वे रुळावर येताना दिसली. मात्र पायलटचे नशीब ट्रेन तिथे पोहोचण्याच्या एक सेकंद आधी अधिकाऱ्यांनी ट्रेनच्या पायलटला ओढले आणि तो ट्रेनच्या जीवघेण्या धोक्यापासून वाचला. जर अधिकारी घटनास्थळी योग्य वेळी पोहचले नसते तर विमान रेल्वे रुळावर आदळल्यामुळे त्याचा स्फोट झाला असता. पायलट रक्तबंबाळ अवस्थेत विमानात अडकला होता.

लॉस अँजलीस  पोलीस विभागाने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, रेल्वे ट्रॅकवर कोसळलेल्या विमानाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बचाव पथकाला समोरून ट्रेन येत असल्याचे दिसले, त्यानंतर त्यांनी लगेच पायलटला आपल्याकडे खेचले. याआधी रेल्वे रुळावर कोसळलेले विमान पूर्णपणे खराब झाले होते, मात्र या छोट्या विमानात सुदैवाने कोणतेही प्रवासी नव्हते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी