Video: वाहतूक पोलीसच्या गाण्यानं लोकांना बनवलं 'यमला पगला दीवाना', उडवली धमाल, बाबा देत सुटला प्लाईंग किस

सोशल मीडियावर (social media) दररोज हजारो व्हिडिओ (Video) शेअर केले जातात. यातील काही व्हिडिओ खूपच मजेदार असतात, तर काहीजण व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित होत असतात. सध्याचं जगं हे सोशल मीडियावर झाल्याने खूप व्हिडिओ व्हायरल (Viral) होतात. यातील काही व्हिडिओ असे असतात की ते आपण परत-परत पाहत असतो.

A policeman became a father with the song 'Yamla Pagla Deewana'
पोलीस कर्मचाऱ्याच्या गाण्यानं बाबा बनले 'यमला पगला दीवाना'  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वाहतूक पोलिसाची अनोखी शैली
  • 'यमला पलगा दिवाना' या गाण्याने नागरिकांमध्ये भरला रंग

Dance Viral Video: सोशल मीडियावर (social media) दररोज हजारो व्हिडिओ (Video) शेअर केले जातात. यातील काही व्हिडिओ खूपच मजेदार असतात, तर काहीजण व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित होत असतात. सध्याचं जगं हे सोशल मीडियावर झाल्याने खूप व्हिडिओ व्हायरल (Viral) होतात. यातील काही व्हिडिओ असे असतात की ते आपण परत-परत पाहत असतो. काही व्हिडिओ प्रसिद्धीसाठी बनवली जातात त्यात अत्यंत दर्जाहीन कटेंट असतो तर काही व्हिडिओमध्ये खरंच लोकांची कला दिसून येत असते. एवढेच नाही तर असे व्हिडिओ थेट लोकांच्या हृदयाला भिडतात. या एपिसोडमध्ये एका ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओतील पोलिसाची स्टाईल लोकांची मने तर जिंकणारी आहेच पण तुम्हालाही थक्क करेल.

बरेच लोक संगीत प्रेमी असतात. संगीत माणसांसोबतच प्राण्यांनाही नृत्य करायला भाग पाडत असते. म्हणूनच जेव्हा-जेव्हा लोकांचे मन दुःखी असते तेव्हा ते संगीत नक्कीच ऐकतात. या व्हायरल व्हिडिओमध्येही तुम्हाला असेच काहीसे पाहायला मिळणार आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही ट्रॅफिक पोलीस कर्मचारी जुन्या काळातील 'यमला पगला दीवाना' हे सुपरहिट गाणे गात आहे हे आपण पाहू शकतो.

पोलीस कर्मचाऱ्याने ज्या पद्धतीने गाणे गायले त्यामुळे लोकांना नाचायला भाग पाडले. पोलीस कर्मचाऱ्यासोबत शेकडो लोक गाताना आणि नाचताना दिसले. इतकेच नाहीतर म्हताऱ्या बाबानेही या गाण्याचा जोरदार लुप्त घेतला आणि गाण्याच्या तालावर तरुणांना प्लाईंग किस देऊ लागले. वाहतूक पोलिसाच्या या सुंदर गाण्याने अनेकांची मने जिंकली असून हा व्हिडिओ पुन-पुन्हा पाहू वाटत आहे. 

Read Also : राऊतांच्या घरात मिळालेले पैसे सीएम विरोधातील कारवाईसाठी?

व्हिडिओ तुम्हाला डान्स करायला लावेल...

या व्हिडिओमध्ये मध्यभागी असलेल्या एका वृद्धाने संपूर्ण वातावरण बदलून टाकले. तो ज्या पद्धतीने डोलणाऱ्या लोकांना फ्लाइंग किस देत होता, त्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले.  आता हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे.  हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर 'indianmusicsouls' नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. तर सुमारे तीन हजार लोकांनी त्याला लाईक केले आहे. त्याच वेळी, लोक व्हिडिओवर मजेदार आणि मजेदार कमेंट करत आहेत. 

Read Also : ऐकलं का! शिंपीही बनतो देशाचा अभिमान, अचिंतनं केलंय शिवणकाम

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी