सावत्र आई मुलांसमोर झाली टॉपलेस, आणि मग झालं असं की... 

एक सावत्र आई आपल्या मुलांसमोर टॉपलेस झाली. तिनं या प्रकरणात लैंगिक पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. हे प्रकरण अमेरिकेतलं आहे.

Representative Image
सावत्र आई मुलांसमोर झाली टॉपलेस, आणि मग झालं असं की...  

यूटाः अमेरिकेतल्या यूटामध्ये एका महिलेने कायद्याला आव्हान दिलं आहे आणि जगभरातील पुरुष आणि स्त्रियांद्वारे भेदभावपूर्ण वर्तनाबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. बुकानन नावाची महिला आपल्या सावत्र मुलांसमोर टॉपलेस झाली आणि याच कारणामुळे तिला लैंगिक पक्षपातीपणाचा आरोप सहन करावा लागला. या आरोपांचा सामना केल्यानंतर तिनं आता कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

एक 28 वर्षीयमहिला जी आपल्या दोन सावत्र मुलांसमोर टॉपलेस झाल्यानं गुन्हेगार असल्याच्या आरोपांचा सामना करत आहे. या घटने दरम्यानही टॉपलेस झालेल्या महिलेच्या पतीवर कोणतीही कारवाई झाली नाही.

पोलिसांनी दावा केला आहे की, बुकानननं आपलं शर्ट काढलं होतं. मंगळवारी महिलानं कोर्टात अर्ज केला. जेव्हा तिला कळलं की आपल्याला दोषी ठरवलं गेलं तर कोर्टात लैंगिक अपराधी म्हणून खटला दाखल करण्यात येईल. बुकाननच्या वकिलांनी हा आरोप हास्यास्पद असल्याचं  म्हटलं आहे, वकिल म्हणाले, तिला (अन्य महिलांना) आपल्या मुलांना टॉपलेस पाहून काळजी करावी लागेल?

काय आहे पूर्ण प्रकरण 

2017 च्या शेवटी किंवा 2018च्या सुरूवातीला 28 वर्षीय बुकानन आणि तिचा पती आपल्या गॅरेजमध्ये काम करत होते. त्यावेळी दोघांनी शर्ट काढले होते. कारण दोघांना आपलं शर्ट  धूळपासून वाचवायचे होते. तेव्हा बुकाननची सावत्र दोन्ही मुलांनी (एक 9 वर्षाचा आणि दुसरा 13 वर्षांचा) दोघांना शर्टविना पाहिलं. 

जेव्हा या दोन्ही मुलांच्या आईला या घटनेची माहिती मिळाली, तेव्हा तिनं वेलफेअर ऑफिसरशी संपर्क साधला आणि बुकानन विरोधात आरोप लावला. तक्रार दाखल केल्यानंतर 28 वर्षीय महिलेला तुरूंगात पाठवण्यात आलं. मात्र बुकाननच्या पतिविरोधात कोणतीही कारवाई केली नाही.  बुकाननचे वकिल  रॅन्डी रिचर्ड्स यांच्यानुसार, दोषी ठरल्यास तिला 10 वर्षांसाठी लैंगिक अपराधीच्या रुपात गुन्हेगार म्हणून खटला सहन करावा लागेल.

महिलेकडून करण्यात आलेले दावे 

बुकानन यांनी फॉक्स न्यूजला सांगितले की, ही घटना माझ्या घराच्या परिसरात झाली. ही घटना घडली तेव्हा माझा पती माझ्यासोबतचं होता. माझ्याविरोधातली कोर्टाची कारवाई लैंगिक पक्षपातीपणाचा  (gender bias)  पुरावा आहे. माझ्या पतीविरोधात शर्ट काढण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही. 

बुकानन यांनी त्यांच्याविरूद्ध केलेल्या कारवाईला आव्हान देत असे म्हटले होते की महिलेचे निप्पल नेहमी अश्लीलतेशी संबंधित असतात, मात्र पुरुषांच्या शरीरावरही ते लागू होत नाही. अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन ऑफ युटा आणि बुकानन यांनी कोलोरॅडो येथील कोर्टाच्या निर्णयाचा हवाला दिला.  ज्याने राज्यातली टॉपलेस बंदी रद्द केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी