मुंबई : देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेले आनंद महिंद्रा हे त्यांच्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसाठी ओळखले जातात. तितके ते त्यांच्या ट्विटसाठी चर्चेत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये हा मुलगा हँडल न धरता सायकल चालवत आहे. आणि त्याच्या डोक्यावर मोठ्या ओझ्यांचा गठ्ठा ठेवला आहे. ('The thing that hurts me is...' Anand Mahindra's pain by sharing the video)
अधिक वाचा : Srivalli Song Dance : चिंपांझी झाला 'पुष्पा' राज! अल्लू अर्जुनच्या स्टाईलमध्ये केला श्रीवल्ली गाण्यावर डान्स
आनंद महिंद्रा बिझनेस टायकून आनंद महिंद्रा त्यांच्या स्पष्टपणासाठी ओळखले जातात. त्यांनी अशा अनेक लोकांना मदत केली आहे ज्यांना खरोखरच कोणत्या ना कोणत्या मदतीची गरज होती. आता ट्विटरवर ते एका खेड्यातील मुलावर खूप इम्प्रेस झालेले दिसत आहेत. तरुणाचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी त्याचे जोरदार कौतुक केले आहे.
आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण ओढे डोक्यावर धरून सायकल चालवताना दिसत आहे. आश्चर्य म्हणजे त्याने दोन्ही हातांनी बंडल पकडले असून हँडल न धरता सायकल धावत आहे. व्हिडिओमध्ये हा तरुण हात न वापरता सहज सायकल वळवत आहे. त्याचे सर्व लक्ष डोक्यावर बंडल पकडण्यावर आहे.
अधिक वाचा : Viral Story : महिलेने 21 दिवसांत 15 जणांना केले डेट, शेअर केली डेटिंगची अनोखी पद्धत
या तरुणाचे कौतुक करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, "या तरुणाचा तोल खूप चांगला आहे. मात्र, मला दुखावणारी गोष्ट म्हणजे आपल्या देशात असं करणारा तो एकटा नाही" असे बरेच लोक आहेत जे प्रतिभावान जिम्नॅस्ट/खेळाडू असू शकतात, परंतु त्यांना ओळखणे आणि त्यांना प्रशिक्षण देणे सोपे नाही."
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओला लोक कमेंट सेक्शनमध्ये आनंद महिंद्रा यांना आपापल्या परीने सल्ले देत आहेत. युजर्सनी आनंद महिंद्रा यांना सल्ले दिले, एका यूजरने त्यांना सांगितले की, यासाठी आम्ही व्हिलेज गॉट टॅलेंटसारखे काही प्लॅटफॉर्म बनवू शकतो, तर दुसऱ्याने लिहिले की, अशा लोकांचे व्हिडिओ अपलोड करता येतील असे प्लॅटफॉर्म तयार करा. ज्याला आनंद महिंद्रा यांनीही सहमती दर्शवली.