खड्ड्यातील पाण्याने आंघोळ करत व्यक्तीचं अनोखं आंदोलन; स्नान केल्यानंतर एका पायावर आमदारासमोर केली तपश्चर्या

Kerala Man Unique Protest: आंदोलनाचा (agitation) एक व्हिडिओ (Video ) ऑनलाइन समोर आला आहे. क्लिपमध्ये बादली, साबण आणि आंघोळीचा (bath) टॉवेल घेऊन बाहेर आलेला माणूस पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात आंघोळ करताना दिसत आहे. वाहनधारक तेथून जात असताना रस्त्यावरील घाणेरड्या पाण्याच्या खड्ड्यात ही व्यक्ती कपडे धुत असल्याचे चित्रीकरणही (Filming) करण्यात आले आहे.

Performed penance on one leg while bathing in pit water
खड्ड्यातील पाण्याने आंघोळ करत एका पायावर केली तपश्चर्या  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • वाढत्या धोक्याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी केरळमधील (Kerala) एका व्यक्तीचे अनोखे आंदोलन
  • आंदोलन करणाऱ्या व्यक्तीची ओळख हमजा पोराली अशी झाली आहे.
  • स्थानिक आमदार युए लतीफसमोर व्यक्तीची तपश्चर्या

Kerala Man Bathes In Muddy Water: रस्त्यांवरील खड्ड्यांच्या (Potholes)वाढत्या धोक्याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी केरळमधील (Kerala) एका व्यक्तीने नुकतेच अनोखे आंदोलन (agitation) केले. त्याच्या या संपूर्ण कामगिरीचा व्हिडिओ (Video) ऑनलाइन (online) व्हायरल झाला आहे. क्लिपमध्ये बादली, साबण आणि आंघोळीचा टॉवेल घेऊन बाहेर आलेला माणूस पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात स्नान करताना दिसत आहे. वाहनधारक तेथून जात असताना रस्त्यावरील घाणेरड्या पाण्याच्या खड्ड्यात तो कपडे धुत असल्याचे चित्रीकरण करण्यात आले असून हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायल होत आहे. दरम्यान असं अनोखं आंदोलन करणाऱ्या व्यक्तीची ओळख हमजा पोराली अशी झाली आहे.  केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात रविवारी सकाळी ही घटना घडली.  

खड्ड्यात विचित्र आंदोलनामुळे व्हायरल झाला व्यक्ती 

दरम्यान हमजा पोराली यांचे जे विचित्र आंदोलन म्हणजे साचलेल्या पाण्यात बसून आंघोळ करणं आणि तपश्चर्या करणं चालू होतं तेव्हा, स्थानिक आमदार युए लतीफ तेथे पोहोचले, हे आपण या क्लिपमध्ये पाहू शकतो.  आमदार आलेले पाहिल्यानंतर हमजा ध्यान मुद्रेत बसून राहिला. त्यानंतर आमदारासमोर हमजा त्या साचलेल्या पाण्यात योगमुद्रेत उभा राहिला. 

केरळमध्ये खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनी हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. दरम्यान एर्नाकुलम जिल्ह्यातील नेदुम्बसेरी येथे राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यामुळे 52 वर्षीय स्कूटरस्वार रस्त्यावर पडला होता आणि त्याला मागून येणाऱ्या ट्रकने चिरडल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. 

Read Also : मनोधैर्य योजनेकडे शासनाचं दुर्लक्ष, चित्रा वाघ यांचा आरोप

केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणाची घेतली दखल 

या प्रकरणाची दखल घेत केरळ उच्च न्यायालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) तातडीने खड्डे बुजवण्यास सांगितले आहे.  न्यायमूर्ती देवन रामचंद्रन यांच्या एकल खंडपीठाने असा निर्णय दिला की, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी कोणत्याही रस्त्याच्या संदर्भात आणि जेथे खड्डे पडले असतील त्याबाबत आदेश जारी करावेत.  कार्यक्षेत्र अभियंते कंत्राटदारांवर आवश्यक कारवाई करतील. किंवा इतर कोणतीही व्यक्ती जी जबाबदार असू शकते.


Read Also : महागाईचा फटका, वर्षभरात खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी