Viral Video: माकड आणि लहान मुलामध्ये जोरदार हाणामारी; दोघांचे भांडण पाहून बसेल धक्का

व्हायरल झालं जी
Updated May 25, 2022 | 15:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

Funny Video । सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरील युजर्संचे मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ विचार करण्यास भाग पाडतात.

The video of the monkey and the little boy fighting is going viral
माकड आणि लहान मुलामध्ये जोरदार हाणामारी, पाहा व्हिडीओ   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात.
  • सध्या माकड आणि लहान मुलाच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
  • माकड आणि लहान मुलाच्या भांडणाला त्यांची मैत्री असल्याचे काही लोक म्हणत आहेत.

Funny Video । मुंबई : सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ सोशल मीडियावरील युजर्संचे मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ विचार करण्यास भाग पाडतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. कारण या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा आणि माकड यांच्यात जोरदार भांडण सुरू आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक हास्यास्पद प्रतिक्रिया देत आहेत. (The video of the monkey and the little boy fighting is going viral). 

अधिक वाचा : वयाच्या ५४ व्या लग्नबंधनात अडकले हंसल मेहता

दरम्यान, तुम्ही अनेकदा माकडाने लोकांना त्रास दिल्याच्या व्हिडीओ पाहिल्या असतील. त्यांचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र आज आपण भाष्य करत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा माकडाला त्रास देत आहे. दरम्यान माकडाचा राग अनावर होतो आणि त्या दोघांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होते. 

अधिक वाचा : जूनमध्ये 5 ग्रह बदलतील त्यांची चाल

माकडाने दाखवला हिसका 

व्हिडीओमध्ये पाहिल्याप्रमाणे माकड आणि लहान मुलगा यापैकी कोणीही हार मानायला तयार नाही. एवढेच नाही तर माकडही घाबरत नव्हते. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा मजेदार व्हिडीओ 'dalpat__rana_21' नावाच्या आयडीवरून इंन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा डे मेकिंग आणि हास्यास्पद  व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर दोन लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. त्याचबरोबर लोक या व्हिडीओवर भन्नाट कमेंट करत आहेत.

युजर्संनी दिल्या विविध प्रतिक्रिया

माकड आणि लहान मुलाच्या भांडणाला काही युजर्संनी त्यांची मैत्री आहे असे म्हटले आहे. तर काहींनी प्रभु रामाचे नाव लिहून त्यांची मैत्री असल्याचे सांगितले. लक्षणीय बाब म्हणजे काही युजर्संचा तर याच्यावर विश्वासही बसत नाही. ही व्हिडीओ खरी आहे की खोटी यावरून देखील चर्चा रंगली आहे. तर काहींनी माकड आणि लहान मुल एकसारखे असल्याचे म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी