Viral: अरे बापरे! लग्नाच्या दिवशीच महिलेने दिला मुलाला जन्म; सर्वकाही करावे लागले रद्द

व्हायरल झालं जी
Updated Jun 02, 2022 | 13:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shocking News In Marathi | या जगात अनेक विचित्र घटना घडत असतात. काही घटना तर अशा असतात ज्यांच्याबाबत आपण कधी विचार पण करत नाही. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार स्कॉटलंडमधून समोर आला आहे, ज्याबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल.

The woman gave birth to a child on the day of the wedding
अरे बापरे! लग्नाच्या दिवशीच महिलेने दिला मुलाला जन्म  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लग्नाच्या दिवशीच महिलेने दिला मुलाला जन्म.
  • हा धक्कादायक प्रकार स्कॉटलंडमधून समोर आला आहे.
  • रेबेका मॅकमिलन आणि निक चीथम हे दोघे स्टर्लिंगशायरमध्ये लग्न करणार होते.

Shocking News In Marathi | मुंबई : या जगात अनेक विचित्र घटना घडत असतात. काही घटना तर अशा असतात ज्यांच्याबाबत आपण कधी विचार पण करत नाही. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार स्कॉटलंडमधून समोर आला आहे, ज्याबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल. कारण इथे एका महिलेने तिच्या लग्नाच्या दिवशीच एका मुलाला जन्म दिला आहे. यामुळे लग्नाच्या कार्यक्रमासह इतर सर्वकाही रद्द करावे लागले. चला तर मग जाणून घ्या काय आहे हे संपूर्ण प्रकरण?. (The woman gave birth to a child on the day of the wedding). 

अधिक वाचा : या ४ लोकांनी चुकूनही पिऊ नये ऊसाचा रस, वाचा सविस्तर

माहितीनुसार, रेबेका मॅकमिलन आणि निक चीथम हे दोघे स्टर्लिंगशायरमध्ये लग्न करणार होते. लग्नाच्या दिवशीच रेबेकाला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. त्यामुळे लग्न रद्द करावे लागले. लग्न अविस्मरणीय व्हावे अशी दोघांचीही इच्छा असल्याचे रेबेकाने सांगितले. या लग्नाला २०० पाहुणे येणार होते. पण लग्नाच्या काही काळापूर्वीच तिला रुग्णालयात जावे लागले, जिथे तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. रेबेकाने सांगितले की डिलिव्हरीची तारीख एक महिन्यानंतर होती. त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा बेत आखला होता. पण अचानक सर्वकाही बदलले आणि ती एका महिन्यापूर्वीच आई झाली. 

लग्नाच्या दिवशीच झाला मुलाचा जन्म 

रेबेकाने सांगितले की, जुलै २०२१ मध्ये तिची निकसोबत एंगेजमेंट झाली होती. दोघेही पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. २१ मे रोजी त्यांचे लग्न होणार होते. ज्यासाठी सर्व तयारी करण्यात आली होती. जेव्हा रेबेकाला समजले की ती आई होणार आहे, तेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २० जून रोजी बाळाचा जन्म होईल, असे डॉक्टरांनी सांगितले होते. पण मुल वेळेआधीच जन्माला येईल असे कोणालाचा वाटले नव्हते. पण लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत सगळं काही ठीक असताना मात्र लग्नाच्या दिवशीच तिला जाग आल्यावर प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या त्यामुळे लग्न रद्द करावे लागले. यामुळे दाम्पत्याचेही १२ लाखांचे नुकसान देखील झाले आहे. मात्र मुलगा झाल्याने दोघेही खूप खुश आहेत. आम्ही लवकरच लग्न करू असे या जोडप्याने सांगितले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी