Shocking News | नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. इथे अशा काही गोष्टी पाहायला मिळतात ज्यांच्यावर विश्वास ठेवणे देखील कठीण असते. सध्या असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्याने लोकांना धक्काच बसला आहे. कारण एका महिलेला डॉक्टरांसमोर रडणे महागात पडले आहे. डॉक्टरांनी दंडाच्या स्वरूपात हजारो रूपये उकळले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच लोकांना धक्का बसला आहे. तर काही लोक या घटनेची खिल्ली उडवत आहेत. (The woman was fined thousands of rupees for crying in front of the doctor).
अधिक वाचा : जान्हवी कपूर पुन्हा एकदा तिच्या ड्रेसमुळे ट्रोल
दरम्यान, ही आगळीवेगळी घटना अमेरिकेतील असल्याचे बोलले जात आहे. असे सांगितले जात आहे की न्यूयॉर्क मधील यूट्यूबर कॅमिल जॉनसनने सोशल मीडियावर एक घटना शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने तिच्या बहिणीला हॉस्पिटलच्या बिलाचे धक्कादायक सत्य सांगितले आहे. कॅमिलने सांगितले की, डॉक्टरांनी तिच्या बहिणीकडून रडण्याचे बिल देखील घेतले आहे. हा विनोद नसून रुग्णालयाने तीन हजार रुपयांऐवजी ४० डॉलर घेतल्याचे या महिलेचे म्हणणे आहे.
केमिलीने सांगितले की माझी लहान बहीण मागील काही दिवसांपासून आरोग्याच्या समस्येने त्रस्त आहे. अलीकडेच ती डॉक्टरांकडे गेली होती. जिथे ती रडली म्हणून तिला तीन हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला. या बिलाचा फोटो तिने ट्विटरवर शेअर केला आहे, जो सध्या तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान या फोटोच्या पोस्टला पाच लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तर ६६ हजार लोकांनी पोस्ट रिट्विट केली आहे. हे बिल पाहून काही जण आश्चर्यचकित झाले आहेत. त्यामुळे ही बाब अत्यंत धक्कादायक असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे.