113 Year Old Man: जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती झाली ११३ वर्षांची; दीर्घायुष्याचे रहस्य आहे दारू पिणे  

व्हायरल झालं जी
Updated May 28, 2022 | 15:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

World oldest man alive turns 113 । गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती घोषित झालेले व्हेनेझुएलाचे जुआन व्हिसेंट पेरेझ शुक्रवारी ११३ वर्षांचे झाले आहेत.

The world's oldest person Juan Vicente Pérez of Venezuela is 113 years old
जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती झाली ११३ वर्षांची  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • व्हेनेझुएलाचे जुआन व्हिसेंट पेरेझ शुक्रवारी ११३ वर्षांचे झाले आहेत.
  • गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जुआन यांना फेब्रुवारीमध्ये स्पेनमधील सॅटर्निनो डे ला फुएन्टे गार्सिया यांच्या मृत्यूनंतर जगातील सर्वात वृद्ध अशी उपमा दिली आहे.
  • जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीला स्वतःचे ४१ नातवंडे, आणखी १८ पणतवंडे आहेत.

World oldest man alive turns 113 । नवी दिल्ली : गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे (Guinness World Records) जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती घोषित झालेले व्हेनेझुएलाचे जुआन व्हिसेंट पेरेझ (Juan Vicente Pérez of Venezuela) शुक्रवारी ११३ वर्षांचे झाले आहेत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जुआन यांना फेब्रुवारीमध्ये स्पेनमधील सॅटर्निनो डे ला फुएन्टे गार्सिया यांच्या मृत्यूनंतर जगातील सर्वात वृद्ध अशी उपमा दिली आहे. सॅटर्निनो डे ला फुएन्टे गार्सिया हे १८ जानेवारीला ११२ वर्षे ३४१ दिवसांपर्यंत जिवंत राहिले. (The world's oldest person Juan Vicente Pérez of Venezuela is 113 years old). 

अधिक वाचा : PM किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी करा हे काम नाहीतर...

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या प्रेस रिलीझनुसार, जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीला स्वतःचे ४१ नातवंडे, आणखी १८ पणतवंडे आणि डझनभर नातवंडे आहेत. जुआन यांनी २७ मे रोजी त्याचा ११३ वा वाढदिवस त्याच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसह साजरा केला. 

अधिक वाचा : 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज

वयाच्या ५व्या वर्षांपासूनच केले काम

असे बोलले जाते की फक्त पाच वर्षांचे होते तेव्हा जुआन ऊसाच्या शेतामध्ये काम करायचे आणि वडिलांसोबत कॉफीचीही शेती करायचे. त्यांनी वयाच्या १० व्या वर्षी स्थानिक शाळेत प्रवेश घेतला. त्यांचे शिक्षक बराच काळ आजारी असल्यामुळे ते जास्त शिक्षण घेऊ शकले नाहीत. मात्र शिक्षणातील मुख्य गोष्टी त्यांनी शिकल्या आणि ते वाचनात आणि लिखानात तयार झाले. 

लक्षणीय बाब म्हणजे जुआन आता ११३ वर्षांचे झाले असून तंदुरूस्त देखील आहेत. किंचित वाढलेला रक्तदाब आणि ह्रदयाच्या समस्यांव्यतिरिक्त जे नैसर्गिकरित्या त्याच्या वयानुसार फिट आहेत, जुआन यांचे डॉक्टर म्हणतात की त्याची तब्येत चांगली आहे आणि ते औषधेही घेत नाहीत.

सांगितले दीर्घायुष्याचे रहस्य

या दीर्घायुष्याचे रहस्य काय आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. यावर जुआन म्हणतात की, कठीण परिश्रम करा, सुट्टीच्या दिवशी आराम करा, लवकर झोपा, दररोज एक ग्लास ॲगार्डिएंट (drink a glass of aguardiente) प्या, देवावर प्रेम करा आणि त्याला नेहमी तुमच्या हृदयात ठेवा."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी