Electricity Bill: नवी दिल्ली: सायबर क्राईममध्ये (Cyber Crime) दिवसेंदिवस वाढ होत आहे. कारण हॅकर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्ती शोधून काढतात. अशीच एक युक्ती शोधून भामटे सामान्य नागरिकांना टार्गेट करत असल्याचं समोर आलं आहे. हॅकर्स तुमचे वीज बिलावरुन (Light Bill) आता तुम्हाला लाखो रुपयांना गंडा घालू शकतात. (Electricity Bill Scam) सामान्यत: वीज मंडळं नागरिकांना त्यांचे वीज बिल वेळेवर भरावे यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आठवण करून देते. परंतु काही हॅकर्स याच गोष्टीचा फायदा घेऊन काही फेक मेसेजेसच्या (Fake SMS) माध्यमातून सामान्य नागरिकांची लूट करत आहेत. तुम्ही वीज बिल भरू नका असे आम्ही आपल्याला सांगत नाही. वीज बिल भरणं गरजेचंच आहे. परंतु ते करत असताना जर तुम्हाला यासंबंधीचा काही मेसेज आला तर तुम्ही वेळीच सतर्क व्हावं एवढीच आमची अपेक्षा आहे. (Theft is happening from the bank account in the name of electricity bill Google and the government alerted)
काय आहे संपूर्ण प्रकरण?
खरं तर, मागील काही दिवसात अनेकांनी तक्रार केली आहे की, त्यांना व्हॉट्सअॅपवर वीज बिल भरण्याची आठवण करून देणारे अनेक मेसेज आले आहेत. अन्यथा त्यांचे वीज कनेक्शन कापण्यात येईल असंही या मेसेजमध्ये लिहिले आहे. पण हेच मेसेज आपल्यासाठी धोकादायक ठरु शकतात. कारण फसवणूक करणारे भामटे हे लोकांच्या बँक खात्यातील पैशांवर डल्ला मारत असल्याचं आता उघड झालं आहे.
अधिक वाचा: Optical Illusion: या फोटोमध्ये लपले आहे फुलपाखरु, ३० सेकंदात दाखवा शोधून
मेसेजमध्ये एक फोन नंबर असतो, जो स्कॅमरचा असतो. जेव्हा यूजर हा नंबर डायल करतात तेव्हा ते विजेचे बिल भरण्यासाठी स्कॅमर्सच्या प्रभावाखाली येतात आणि फसवणुकीचे बळी ठरतात. गुजरात, महाराष्ट्र, पंजाब आणि ओडिशासह अनेक शहरांमध्ये वीज घोटाळ्याची बरीच प्रकरणे आतापर्यंत नोंदवली गेली आहेत. त्यामुळे तुम्हाला अशा स्वरुपाचा काही मेसेज आला तर वेळीच सतर्क व्हा.
अधिक वाचा: Volcano eruption: ज्वालामुखीच्या उद्रेकाचा अतिभयंकर VIDEO, पाहा एका दगडाचं काय झालं..
फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी काय केलं पाहिजे?
लोकांना जागरूक करण्यासाठी आज सरकारने स्वतः Google आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासोबत जाहिराती दिल्या आहेत. अशी फसवणूक टाळण्यासाठी सरकारने लोकांना दोन मार्ग सांगितले आहेत -
यापूर्वी अदानी इलेक्ट्रिसिटीकडूनही यासंदर्भात अलर्ट जारी करण्यात आला होता. कंपनीने ग्राहकांना ट्विट करुन सांगितले होते की, 'जर तुम्हाला वीज कपातीचा एसएमएस आला, ज्यामध्ये तुम्हाला वीज अधिकाऱ्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. असं म्हटलं असेल तर समजून घ्या की हा एका फेक मेसेज आहे. आम्ही नोंदणी नसलेल्या नंबरवरून कधीही एसएमएस पाठवत नाही.'