Optical illusion test : दृष्टीभ्रम निर्माण करणाऱ्या चाचणीतील चित्रात 12 प्राणी आहेत, जो प्राणी तुम्हाला सगळ्यात आधी दिसेल तो सांगेल तुमचं व्यक्तिमत्त्व

व्हायरल झालं जी
Updated Jun 02, 2022 | 20:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Optical illusion test : दृष्टीभ्रम निर्माण करणारी ही चाचणी खूपच मजेशीर आहे. तुम्ही सगळ्यात आधी काय पाहता यावरून तुमच्या व्यक्तिमत्त्वातील काही पैलू यामुळे समजतात.

There are 12 animals in the optical illusion test, The animal you see first will tell about your personality
या चित्रात तुम्हाला कोणता प्राणी आधी दिसला?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • दृष्टीभ्रम निर्माण करणाऱ्या या चित्रात 12 भिन्न प्राणी आहेत
 • जॅकपॉटजॉय येथील तज्ज्ञांनी हे दृष्टीभ्रम निर्माण करणारे चित्र तयार केले आहे
 • दृष्टीभ्रम निर्माण करणारे हे चित्र Myers-Briggs व्यक्तिमत्व चाचणीपासून प्रेरित आहे

Optical illusion test : दृष्टीभ्रम निर्माण करणारी ही चाचणी खूपच मजेशीर आहे. तुम्ही सगळ्यात आधी काय पाहता यावरून तुमच्या व्यक्तिमत्त्वातील काही पैलू यामुळे समजतात. Myers-Briggs व्यक्तिमत्व चाचणीद्वारे प्रेरणा घेऊन हे नवे दृष्टीभ्रम निर्माण करणारे चित्र तयार करण्यात आले आहे. जॅकपॉटजॉय येथील तज्ज्ञांनी हे चित्र विकसित केले आहे. 


दृष्टीभ्रम निर्माण करणाऱ्या या चित्रात तुम्ही सगळ्यात आधी कोणता प्राणी पाहिला?

The animal you see first in this optical illusion test reveals a lot about your personality

 1.  जर तुम्ही पहिल्यांदा सिंह पाहिला असेल,  तर याचा अर्थ तुम्ही जन्मत: लिडर आहात आणि तुम्ही खूप आत्मविश्वासी आहात. तुम्ही इतरांकडून खूप आदर मिळवला आहे.
 2.  जर या चित्रात तुम्हाला मांजर पहिल्यांदा दिसली असेल, तर याचा अर्थ तुम्ही खूप प्रेरित आणि दृढ आहात. तुम्ही काही वेळा अंतर्मुख होता, आणि तुम्ही स्वत:मध्येच आनंदी असता. 
 3.  जर तुम्हाला लांडगा पहिल्यांदा दिसला असेल, तर तुमचं व्यक्तीमत्त्व गूढ आहे, तुम्हाला शोधून काढण्यासाठी इतरांना कसरत करावी लागते.  तुमच्या स्वतःकडून मोठ्या अपेक्षा असू शकतात आणि कठीण प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी तुम्ही सक्रिय असाल.
 4.  जर तुम्हाला व्हेल अर्थातच देवमासा आधी दिसला असेल, तर तुम्हाला स्वत:बद्दल प्रचंड आत्मविश्वास आहे. तुम्ही स्वत:ला नीट ओळखता. 
 5. या दृष्टीभ्रम निर्माण करणाऱ्या चित्रात तुम्हाला घोडा सर्वप्रथम दिसला असेल, तर तुम्ही साहसी आहात आणि तुम्ही तुमच्या स्वातंत्र्याचा पुरेपूर आनंद उपभोगता. 
 6.  जर तुम्ही घुबड आधी पाहिले असेल, तर तुम्ही नक्कीच हुशार आणि संवेदनशील आहात. 
 7.  जर एखाद्या कोल्ह्याने प्रथम आपले लक्ष वेधून घेतले, तर आपण थोडेसे तापट आहात, मात्र, शूरसुद्धा होऊ आहात. 
 8. जर तुम्हाला सगळ्यात आधी माकड दिसले असेल, तर तुम्ही नेहमी खेळकर आणि हसतमुख असता. 
 9. जर तुम्हाला पहिल्यांदा हत्ती दिसला असेल, तर तुम्ही खूप स्ट्राँग आहात, आणि निस्वार्थीपणे प्रेम करता. 
 10.  दृष्टीभ्रम निर्माण करणाऱ्या या चित्रात तुम्हाला कासव पहिल्यांदा दिसले, तर तुम्ही हुशार तर आहातच पण त्याचबरोबर संवदेनशीलसुद्धा आहात.
 11. तुम्हाला सगळ्यात आधी अस्वल दिसले का, तसं असेल तर तुम्ही बलवान आणि धैर्यवान आहात.
 12. जर तुम्हाला या चित्रात जिराफ सर्वप्रथम दिसला असेल, तर तुम्ही व्यावहारिक आणि संयमशील आहात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी