उन्हात जाताच महिलेच्या कपड्यांचा रंग बदलला, 'जादुई ड्रेस' पाहून लोकं कन्फ्यूज

viral video : तुम्ही तुमच्या आयुष्यात असे अनेक कीटक, वनस्पती आणि फुले पाहिली असतील जी सूर्यप्रकाशात त्यांचा रंग बदलतात. पण तुम्ही कधी असा ड्रेस पाहिला आहे का ज्याचा रंग सूर्यप्रकाशात बदलतो.

There is a lot of discussion about the magical dress of the woman, people are surprised
उन्हात जाताच महिलेच्या कपड्यांचा रंग बदलला, 'जादुई ड्रेस' पाहून लोकं कन्फ्यूज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उन्हात रंग बदलणारा 'जादुई ड्रेस' पाहून लोक गोंधळले

viral video : सोशल मीडिया हे आजच्या काळात एक असे व्यासपीठ बनले आहे, जिथे आपल्याला विविध प्रकारच्या गोष्टी पाहायला, ऐकायला आणि वाचायला मिळतात. ते पाहून अनेकवेळा आपल्याला हसू येते, त्याचवेळी असे व्हिडिओ पाहायला मिळतात. ज्यानंतर आपण आश्चर्यचकित होतो आणि आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो पाहिल्यानंतर तुम्हीही चकीत व्हाल. (There is a lot of discussion about the magical dress of the woman, people are surprised)

अधिक वाचा : Viral Video: अद्भूत, एका हाताने बनवली 15 छायाचित्रे, गरीब मुलीचे टॅलेंट पाहून व्हाल थक्क, नाव गिनिज बुकात दाखल  

तुम्ही तुमच्या आयुष्यात असे अनेक कीटक, वनस्पती आणि फुले पाहिली असतील जी सूर्यप्रकाशात त्यांचा रंग बदलतात. पण तुम्ही कधी असा ड्रेस पाहिला आहे का ज्याचा रंग सूर्यप्रकाशात बदलतो. जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही त्या कपड्यांबद्दल बोलत आहोत. ज्याचा रंग सूर्यास्त होताच बदलतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by IZZI (@izzipoopi)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका महिलेने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे आणि ती लोकांना सांगत आहे की, उन्हात जाताच या ड्रेसचा रंग बदलतो. यानंतर ती घराबाहेर पडते आणि पांढरा दिसणारा ड्रेस अचानक गुलाबी होतो.ती आत आल्यावर ड्रेस पांढरा होतो. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल की विज्ञान किती वेगाने प्रगती करत आहे आणि जगात कोणत्या प्रकारच्या नवीन गोष्टी शोधल्या जात आहेत.

अधिक वाचा : Girl jumped from balcony: नशेच्या गर्तेत बाल्कनीतून मारली उडी, व्हिडिओ पाहून येईल अंगावर काटा
हा व्हिडिओ @izzipoopi नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जो स्वतः एक फॅशन इन्फ्लुएंसर आहे. वृत्त लिहेपर्यंत या व्हिडिओला 2 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर 22 लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. यासोबतच लोक या व्हिडिओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी