Optical Illusion | मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिलक इल्युजनची (Optical Illusions) चर्चा होत असते. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे थोडक्यात आपल्या डोळ्यांना फसवणे अथवा डोळ्यांची परीक्षा घेणे. कारण ते तुमच्या बुद्धीची परीक्षा घेत असतात. हा असा खेळ आहे जो कोणताही वाद न करता मनोरंजनाचे काम करत असतो. दरम्यान असाच एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक मांजर झोपलेली आहे, पण दिसेल त्यालाच जो प्रत्यक्षात जागा आहे. समजलं का? (These two photos will test your intellect).
अधिक वाचा : टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान
या फोटोमध्ये तुम्हाला फक्त लाकूड दिसत असेल पण या जंगलाच्या मध्यभागी कुठेतरी एक मांजर लपलेली आहे. पण ते इतक्या सहजासहजी पाहता येत नाही. मांजराला शोधताना लोकांची तारांबळ उडत आहे पण ती सापडत नाही आहे. हा फोटो सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे.
या फोटोला लोकांनी सोशल मीडियावर विविध प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहले की, "हा फोटो शोधताना आम्ही हार पत्करली आहे. तर एका युजरने लिहिले की, तो त्यामध्ये मांजर शोधण्यात आपले संपूर्ण आयुष्य घालवणार आहे. जर तुम्हाला अजूनही मांजर सापडली नसेल तर नीट पाहा ती आरामात जंगलात झोपली आहे.
लोकांनी या फोटोच्या ट्विटवर कमेंट करून विचारले की, शेवटी मांजर नक्की कुठे लपले आहे. प्रत्येकाला सांगता येत नाही असे नाही, काही लोकांना मांजर दिसले की लगेच शेअर करतात.