Thief died after stuck in door while theft: उत्तरप्रदेशातून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. येथे एका घरात चोरी करण्यासाठी चोर घरात शिरला आणि त्याच दरम्यान असं काही घडलं की, चोर दरवाजात अडकला. त्यानंतर त्याचा तडफडून मृत्यू झाला. (thief die after stuck in door while entering in house for theft crime news marathi)
ही घटना उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील आहे. येथे रात्रीच्या सुमारास चोराने एका घरात प्रवेश करुन चोरी करण्याचा प्रयत्न केला. घरात प्रवेश करत असताना हा चोर दरवाजात अडकला. त्यानंतर त्याने तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याला तेथून बाहेर पडणं शक्य झालं नाही. रात्रभर हा चोर तेथेच अडकून होता. वाराणसी येथील सारनाथ क्षेत्रातील दनियालपूर येथे सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.
हे पण वाचा : कुटुंबासोबत सिनेमा पाहताना तसा सीन आल्यावर कोणत्या राशीची व्यक्ती कशी वागते
मिळालेल्या माहितीनुसार, पावरलूम सेंटर गेल्या दोन दिवसांपासून बंद होतं. एका घरात हे पावरलूम सेंटर सुरू होतं. मात्र, दोन दिवसांपासून बंद असल्याचा फायदा घेत मृतक चोर जावेद याने तेथे प्रवेश करुन चोरीचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचं डोकं दरवाजात अडकलं. असं म्हटलं जात आहे की, त्याने आपलं डोकं बाहेर काढण्यासाठी भरपूर प्रयत्न केले मात्र, त्यात तो अपयशी ठरला अखेर तडफडून तडफडून त्याचा मृत्यू झाला.
हे पण वाचा : गुळाचा एक तुकडा बदलेल तुमचं आयुष्य, केवळ करावा लागेल हा उपाय
ज्यावेळी सकाळच्या सुमारास हा चोर दरवाजात अडकलेला पाहून तेथे नागरिकांनी गर्दी केली. त्यानंतर त्याला तपासले असता तो मृत झाल्याचं समोर आलं. यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतक चोराचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी अद्याप पोलिसांनी अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.