Strange Thief: चोर (Thief) साधारणतः घरातील मौल्यवान वस्तू, पैसे किंवा दाग दागिने चोरून नेण्याचं काम करत असतात. घरात घुसून हाताला लागेल तुम्हाला उचलायचा आणि लंपास करायचा, ही चोरांची नेहमीची कार्यपद्धती असते. मात्र काही चोर हे एखाद्या किरकोळ वस्तूसाठी आपला जीव धोक्यात घालतात. असाच एक चोर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा चोर महिलांच्या एका विशिष्ट वस्तूसाठी इतका वेडा होता की ती चोरण्यासाठी तो आपल्या जीवाची बाजी लावत असे. पकडले जाण्याची रिस्क पत्करूनही तो चोरी करत असे. गेली अनेक वर्ष हा चोर पोलिसांना गुंगारा देत ही वस्तू चोरत होता. मात्र अखेर पोलिसांनी त्याला पकडले.
हा चोर महिलांच्या रेनकोटची चोरी करत असे. महिला वापरत असलेला रेनकोट हा त्याच्या आकर्षणाचा विषय होता. जपानमधील हा चोर रेनकोट घालून जाणाऱ्या महिलांचा पाठलाग करत असे. त्यानंतर या महिलांच्या रेनकोटची चोरी करत असे. रेनकोट काढून ही महिला एखाद्या दुकानात किंवा कार्यालयात गेली, की हा चोरटा रेनकोट घेऊन पसार होत असे. अनेकदा रेनकोट चोरण्यासाठी तो महिलेपाठोपाठ घरात घुसत असे आणि रेनकोट घेऊन पळ काढत असे. त्याच्या या कृत्यामुळेच त्याला पोलिसांनी 'रेनकोट मॅन' असे नाव दिले होते.
अधिक वाचा - Viral Video : साडी नेसून जिममध्ये व्यायाम करणारी 56 वर्षांची महिला
जपान मधील या चोरट्याचे नाव योशिदो योदा. 51 वर्षांचा हा चोर गेल्या 13 वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होत होता. अनेकदा पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्येक वेळी तो चोरी करून पळून जाण्यात यश मिळवत असे. या चोराला पकडण्याचं मोठा आव्हान पोलिसांसमोर होतं. या चोराच्या कार्यपद्धतीवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून होते. अखेर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
अधिक वाचा - रेशनकार्डमध्ये दत्ता ऐवजी नाव छापलं कुत्ता; अधिकाऱ्यासमोर दिसताच लागला भुंकायला [Video]
रेनकोटची चोरी करण्यामागे नेमके काय कारण असावे, याची उत्सुकता पोलिसांना ही होती. या चोराला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि या चोरीमागील खरी कारणे लक्षात आली. पुरुषांना ज्याप्रमाणे महिलांच्या अंतरवस्त्रांचे आकर्षण असते, तसेच या चोरट्याला महिलांच्या रेनकोटचे आकर्षण होते. अधिकाधिक रेनकोट आपल्याकडे असावेत असे त्याला वाटत असे आणि त्यासाठी तो मोठा धोका पत्करूनही रेनकोट चोरत असे. हा चोरटा अगोदर वर्तमानपत्रे टाकण्याचे काम करायचा. याच काळात त्याला प्लास्टिकविषयी आकर्षण निर्माण झाले. रेनकोटमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकबाबत विचार करता करता, त्याला महिला वापरत असलेल्या रेनकोटचे आकर्षण निर्माण झाले. त्यातूनच आपण हे रेनकोट चोरायला सुरुवात केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून 360 रेनकोट जप्त केले असून त्यातील सर्वात महाग रेनकोट हा सहा लाख रुपये किमतीचा आहे.