य़ा कंपनीच्या बॉसने कर्मचाऱ्यांसाठी उघडली तिजोरी, सगळ्यांना दिले साडे सात लाख रूपये

व्हायरल झालं जी
Updated Oct 25, 2021 | 23:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

सारा ब्लॅकरी ही स्पॅन्क्स नावाची कंपनीची मालकीण आहे. नुकतीच स्पॅन्क्स कंपनीचा टर्नओव्हर १.२बिलियन डॉलरपर्यंत गेला. 

sara
य़ा कंपनीच्या बॉसने कर्मचाऱ्यांसाठी दिले साडे सात लाख रूपये 
थोडं पण कामाचं
  • कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी
  • बॉसने सर्व कर्मचाऱ्यांना दिले साडेसात लाख रूपये
  • सोशल मीडियावर होतेय चर्चा

मुंबई: प्रत्येक कंपनी आणि त्याच्या मालकाचे काही गुण असतात. काही बॉससाठी कर्मचारी हे त्यांच्या घरासारखेच असतात तर काही प्रोफेशनलीच असतात मात्र असे काही बॉस असतात जे आपल्या काम आणि योजनांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवर टिकून राहण्यासाठी प्रेरणा देत असतात. तर काही बॉस असेही असतात ज्याबाबत कर्मचारी विचारच करू शकत नाहीत. सारा ब्लॅकली अशीच एक बॉस आहे जिची सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि तिचे कर्मचारी तिला जगातील सर्वात चांगली व्यक्ती असल्याचे बोलत आहेत. 

सारा ब्लॅकली स्पॅन्क्स नावाच्या कंपनीची मालकीण आहे. नुकताच या कंपनीचा टर्नओव्हर १.२ बिलियन डॉलर इतका झाला. इतकंच नव्हे तर या कंपनीमध्ये एका गुंतवूणूक फर्मने हिस्सेदारीही खरेदी केली. इतक्या मोठ्या यशामुळे कंपनीची मालकीण आणि कर्मचारी खुश आहेत. हा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी साराने एक जबरदस्त घोषणा केली. यासाठी पार्टीही ठेवण्यात आली होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sara Blakely (@sarablakely)

या पार्टीमध्ये तिने प्रत्येक कर्मचाऱ्याला दहा हजार डॉलर म्हणजेच साधारण साडेसात लाख रूपये आणि फर्स्ट क्लासची दोन फ्लाईट तिकीट देण्याची घोषणा केली. या घोषणेने तिचे कर्मचारी खूपच खुश झाले आहेत. याशिवाय त्यांनी कर्मचाऱ्यांना अनेक गिफ्ट दिले आहेत. 

बॉसने जिंकलं कर्मचाऱ्यांच मन

या निमित्ताने साराने सांगितलं की ही एक भावनात्मक घोषणा होती जी आनंदाश्रूने भरलेली होती. आपण किती दूर आले आहेत. सारा म्हणाली जगात हवं तिथे जाण्यासाठी प्रथम श्रेणीची दोन विमानाची तिकीटे आणि प्रवासावर खर्च करण्यााठी दहा हजार डॉलर रक्कम देऊन मी साऱ्यांनाच आश्चर्यचकित केले. इन्स्टाग्रामवरील हा व्हिडिओ चांगलाच शेअर होतोय. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी