IAS बनण्यासाठी विद्यार्थी अशी करतात लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी, पाहा हा व्हायरल व्हिडिओ

व्हायरल झालं जी
Updated Mar 27, 2021 | 13:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना किती मेहनत करावी लागते याचे उदाहरण देत एका आयएएस अधिकाऱ्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्याला या तयारीचा अंदाज येईल.

IAS Officer
IAS बनण्यासाठी विद्यार्थी अशी करतात लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी, पाहा हा व्हायरल व्हिडिओ  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • पुस्तकांशी या विद्यार्थ्यांचे असते खास नाते
  • आयएएस अधिकाऱ्याने शेअर केला मजेदार व्हिडिओ
  • यूजर्स या व्हिडिओवर करत आहे मजेदार कॉमेंट्स

लोकसेवा आयोगाच्या (Union Public Service Commission) परीक्षा (exams) किती अवघड (tough) असतात हे सर्वांनाच ठाऊक आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना (students) किती मेहनत (efforts) करावी लागते हे देखिल जगजाहीर आहे. मात्र या सर्व कठीण प्रक्रियेतून (tough process) गेल्यानंतर देशाला (nation) एक योग्य आयएएस अधिकारी (IAS officer) मिळतो. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी विद्यार्थी सर्व ताकदीनिशी प्रयत्न करतात.

पुस्तकांशी या विद्यार्थ्यांचे असते खास नाते

यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या अभ्यासाच्या पुस्तकांशी खास नाते असते. हे विद्यार्थी आपल्या तयारीत इतके गढलेले असतात की सतत त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना अभ्यास आणि परीक्षाच दिसत असतात. त्यामुळेच हे मेहनती विद्यार्थी या महत्वाच्या पदांसाठी पात्र ठरतात.

आयएएस अधिकाऱ्याने शेअर केला मजेदार व्हिडिओ

आयएएस होण्याची इच्छा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे तयारी करावी लागते याचा एक मजेदार व्हिडिओ खुद्द एका आयएएस अधिकाऱ्याने शेअर केला आहे. या अधिकाऱ्याचे नाव अवनीश शरण आहे. An ideal Civil Services Aspirant अशा कॅप्शनसह त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

यूजर्स या व्हिडिओवर करत आहे मजेदार कॉमेंट्स

या व्हिडिओत दिसत आहे की कसा यूपीएससी करणारा विद्यार्थी फक्त अभ्यासच करताना दिसतो. याचे मजेदार चित्रण या व्हिडिओत आहे. यातून आपल्याला दिसेल की यूपीएससीची परीक्षा अतिशय अवघड आहे आणि यासाठी अतिशय मेहनत घेऊन तयारी करावी लागते तेव्हाच सफलता मिळते. या व्हिडिओला सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळत आहे आणि यावर लोक मजेदार कॉमेंट्सही करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी