इजिप्तच्या एका इसमाने विंचवाच्या विषाला केले उत्पन्नाचे साधन, एक ग्रॅम विषाची किंमत करेल आपल्याला चकित

इजिप्तच्या एका इसमाला इथे विंचवांचा राजा म्हणून ओळखले जाते. त्याने 2018मध्ये विष हाच आपल्या उत्पन्नाचा स्रोत बनवण्याचा निर्णय घेतला. आपल्या आजूबाजूच्या परिसराला तो प्रेमाने विंचवांचे साम्राज्य असे म्हणतो.

Scorpion
इजिप्तच्या एका इसमाने विंचवाच्या विषाला केले उत्पन्नाचे साधन, एक ग्रॅम विषाची किंमत करेल आपल्याला चकित  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • विंचवाच्या विषालाच केले उत्पन्नाचे साधन
  • अबूंच्या निवासाच्या परिसरात प्रत्येक कुटुंबाकडे आहेत विंचवाच्या कहाण्या
  • एक ग्रॅम विषाची किंमत असते 7,500 डॉलर

इजिप्तच्या (Egypt) एका इसमाला इथे विंचवांचा राजा (king of scorpions) म्हणून ओळखले जाते. त्याने 2018मध्ये विष (poison) हाच आपल्या उत्पन्नाचा स्रोत (source of income) बनवण्याचा निर्णय घेतला. आपल्या प्रयोगशाळेच्या (laboratory) आसपास वाळूचे डोंगर (sand hills) आणि ताडाच्या उंच झाडांना अबू अल सऊद नामक हा इसम विंचवांचे साम्राज्य (empire of scorpions) असे म्हणतो. न्यू व्हॅली (New Valley) प्रांतात सर्वाधिक मागणी असलेल्या डेथस्टॉकर (Death Stalker) नावाच्या विंचवासह साधारण पाच वेगवेगळया विंचवाच्या प्रजाती आढळून येतात. पेशाने मेकॅनिकल इंजिनीयर असलेल्या अबू यांनी तेल क्षेत्रात दोन दशके काम केले आहे. मात्र 2018मध्ये त्यांनी आपले क्षेत्र बदलायचे ठरवले. आता ते औषध क्षेत्रातील संशोधनासाठी विंचवांच्या विषाचे उत्पादन करतात.

विंचवाच्या विषालाच केले उत्पन्नाचे साधन

नेहमी पांढरा लॅब कोट परिधान केलेले 44 वर्षीय अबू सांगतात, "मी इंटरनेटवर काहीतरी शोधत होतो तेव्हा मला कळले की विंचवाचे विष हे बाजारातील सर्वाधिक महागड्या उत्पादनांपैकी एक आहे. त्यामुळे मी स्वतःला विचारले, की या वाळवंटी वातावरणाचा फायदा का घेऊ नये जिथे विंचू सर्वत्र फिरताना आढळतात?" जैववैद्यकीय संशोधक विंचवाच्या विषातील औषधी गुणांचा अभ्यास करत आहेत ज्यामुळे यातील दुर्मिळ आणि शक्तिशाली न्यूरोटॉक्सिन विषाची मागणी प्रचंड वाढली आहे. याचे उत्पादन आता मध्यपूर्वेतील अनेक देशांमध्ये केले जाते.

अबूंच्या निवासाच्या परिसरात प्रत्येक कुटुंबाकडे आहेत विंचवाच्या कहाण्या

अबू अल साऊद हे इजिप्तची राजधानी कैरोपासून साधारण 800 किलोमीटर नैऋत्येला राहतात. आपल्या प्रयोगशाळेच्या आसपास वाळूचे डोंगर आणि ताडाच्या उंच झाडांना ते प्रेमाने विंचवांचे साम्राज्य असे म्हणतात. त्यांचे म्हणणे आहे की इथल्या प्रत्येक कुटुंबाकडे विंचवांच्या डसण्याची कहाणी आहे. जनावरांपासून विष काढण्यासाठी प्रयोगशाळेतील नियंत्रित आणि विशेष वातावरणात विंचवांना हलका विद्युत झटका दिला जातो. उत्तम गुणवत्तेचे विष मिळवण्यासाठी दोन अर्कांच्या मध्ये 20-30 दिवस वाट पाहावी लागते. अल सऊद सांगतात, "शुद्धतेची पातळी ही महत्वाची असते आणि एक ग्रॅम विषासाठी 3000-3500 विंचवांची गरज लागते." हे द्रव्यपदार्थ रेफ्रिजिरेटरमध्ये ठेवले जातात आणि कैरोला पाठवले जातात जिथे ते सुकवून त्यांची पावडर करून पॅकिंग केले जाते.

एक ग्रॅम विषाची किंमत असते 7,500 डॉलर

त्यांनी सांगितले की विंचू किंवा सापाच्या विषाचा वापर हा प्लाज्मा अँटीसेरा तयार करण्यासाठी केला जातो. प्रत्यक्ष उत्पादनात विषाचा वापर होणारे काही उत्पादन नाही, मात्र यावर आशावादी संशोधन सुरू आहे. न्यू व्हॅली प्रांतात सर्वाधिक मागणी असलेल्या डेथस्टॉकर नावाच्या विंचवासह साधारण पाच वेगवेगळया विंचवाच्या प्रजाती आढळून येतात. अबू यांनी दिलेल्या माहितीनुसार याचे वैज्ञानिक नाव लेउरस क्विनकेस्ट्रीएटस आहे आणि हा जगातील सर्वात विषारी विंचू आहे. याच्या एक ग्रॅम विषाची किंमत 7,500 डॉलरपर्यंत असू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी