Optical illusion: या ऑप्टिकल इल्युजनमध्ये तुम्हाला सर्वात आधी कोणता प्राणी दिसतो त्यावरून तुमच्या व्यक्तिमत्वातील सर्वात महत्त्वाचा गुण कोणता हे लक्षात येतं...तुम्ही कसे आहात ?

lion and zebra optical illusion : वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) सर्वत्र व्हायरल होत आहेत. या ऑप्टिकल इल्युजन चित्रांमध्ये लपलेले प्राणी शोधण्याचे आव्हान असते. हे एक सिंह (Lion)आणि झेब्राचे (Zebra)ऑप्टिकल इल्युजन आहे. एखाद्या चित्रात तुम्ही प्रथम कोणत्या प्राण्याला पाहता याच्या आधारावर तुमच्या व्यक्तिमत्त्वाची प्रबळ वैशिष्ट्ये स्पष्ट करणारा हा एक ऑप्टिकल इल्युजन आहे. तुम्ही या ऑप्टिकल इल्युजनला ज्या प्रकारे पाहता ते तुमच्या विचार प्रक्रियेस स्पष्ट करते.

Optical Illusion for personality test
ऑप्टिकल भ्रम -आधारित व्यक्तिमत्व चाचणी  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • हे आश्चर्यकारक ऑप्टिकल इल्युजन तुमच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये प्रकट करते.
  • चित्राचे नीट निरीक्षण करा आणि या व्यक्तिमत्व चाचणीत तुम्हाला प्रथम आढळणारा प्राणी लक्षात ठेवा.
  • तुम्ही यात झेब्रा, सिंह आणि पक्षी शोधत आहात.

Personality Test Optical illusion : नवी दिल्ली : वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) सर्वत्र व्हायरल होत आहेत. या ऑप्टिकल इल्युजन चित्रांमध्ये लपलेले प्राणी शोधण्याचे आव्हान असते. हे एक सिंह (Lion)आणि झेब्राचे (Zebra)ऑप्टिकल इल्युजन आहे. एखाद्या चित्रात तुम्ही प्रथम कोणत्या प्राण्याला पाहता याच्या आधारावर तुमच्या व्यक्तिमत्त्वाची प्रबळ वैशिष्ट्ये स्पष्ट करणारा हा एक ऑप्टिकल इल्युजन आहे. परंतु, खात्री बाळगा की हे विश्लेषण तज्ञांनी केले आहे. मग तुम्ही विचाराल हे ऑप्टिकल इल्युजन म्हणजे व्यक्तिमत्व चाचणी (personality test) कशी आहे बरं. हे व्हिज्युअल भ्रम हे काही फुरसतीच्या वेळेचे ब्रेन टीझर्स नाहीत जे तुम्ही निवातंपणे आरामखुर्चीवर बसून पाहावे. तुम्ही या ऑप्टिकल इल्युजनला ज्या प्रकारे पाहता ते तुमच्या विचार प्रक्रियेस स्पष्ट करते. तुम्ही डाव्या मेंदू-केंद्रित व्यक्ती आहात की उजव्या मेंदूच्या व्यक्ती आहात याबद्दलची माहिती यातून दिसते. काही चित्रे अशी असतात ज्यात प्राणी समोर असतात पण सहज दिसत नाहीत. सोशल मीडियावर विविध प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन व्हायरल (Viral) होत आहेत. (This optical illusion gives away about dominant traits of your personality)

अधिक वाचा : Optical Illusion : हे चित्र पाहून तुम्हाला जे दिसेल त्यावरून ठरवता येईल तुम्ही कोणत्या क्षेत्रात नोकरी करायला हवी

सिंह आणि झेब्राचे ऑप्टिकल इल्युजन (The lion and zebra optical illusion)

हे सामान्य ज्ञान आहे की ज्यांचा डावा मेंदू प्रबळ आहे ते विश्लेषणात्मक समस्या सोडवणारे आहेत आणि ते तर्कशुद्धपणे तर्क करू शकतात. तर जे त्यांच्या उजव्या मेंदूचा अधिक वापर करतात ते अधिक सर्जनशील आणि अंतर्मुख व्यक्ती आहेत. ही माहिती द माइंड्स जर्नल मधील तज्ञांना, किंवा इतर तज्ज्ञांना कोणत्याही व्यक्तीचे मनोविश्लेषण करण्यास मदत करते.

या ऑप्टिकल इल्युजन-आधारित व्यक्तिमत्व चाचणीमध्ये तुम्हाला दिसणारा पहिला प्राणी तुमची प्रमुख वैशिष्ट्ये प्रकट करतो असे म्हटले जाते. चित्राचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि पहिल्या दृष्टीक्षेपात लक्षात आलेल्या आकृतीकडे लक्ष द्या.

अधिक वाचा : Optical illusion: या कोडे घालणाऱ्या चित्रात जवळपास कोणीही सर्व प्राणी शोधू शकत नाही...पण तुम्ही ओळखू शकता का?

तुम्हाला काय दिसले?

झेब्रा, अनेक झेब्रा

तज्ञांच्या विश्लेषणावरून असे सूचित होते की या ऑप्टिकल इल्युजनमध्ये झेब्रा पाहणारे कोडे करणारे लोक इतरांवर प्रभाव टाकणारे, प्रभावशाली लोक आहेत ज्यांना विनोदबुद्धी आहे आणि कंटाळ्याबद्दल तिरस्कार आहे. अशा व्यक्तीला लोकांमध्ये राहायला आवडते आणि
एकटे असताना असुरक्षित वाटण्याची प्रवृत्ती असते. लोक तुमचे निर्दोष संवाद कौशल्य आणि तुमच्या बाह्य व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतात.

एक सिंह

जर तुम्हाला सिंह दिसला तर “तुम्ही अभिमानाने भरलेले आहात आणि तुम्हाला तुमच्या अहंकाराची जाणीव आहे. “तुमची प्रबळ इच्छाशक्ती आणि दृढनिश्चय तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवते. जरी तुम्ही इतरांपेक्षा वेगले असाल तरीही, तुम्ही त्याची तमा बाळगत नाही,” असे यातून स्पष्ट होते.
सिंह एक बलवान, एकाकी नेत्याचे प्रतिनिधित्व करतो आणि ज्यांनी ते प्रथम पाहिले ते प्रबळ असतात आणि ते पुढाकार घेण्यास घाबरत नाहीत. मात्र तुमची क्षमता सिद्ध करण्याच्या तुमच्या प्रयत्नात, तुम्ही हाती घेतलेल्या कोणत्याही प्रकल्पात टीमचा समावेश असलेल्या मोठ्या बाबींकडे तुम्ही दुर्लक्ष करता.

अधिक वाचा : Optical Illusion: या चित्रात एक बिबट्या बसला आहे, भल्या भल्यांना शोधता येत नाही, पाहा तुम्हाला सापडतोय का?

सिंह आणि झेब्रा

या व्यक्तिमत्व चाचणीत सिंह आणि झेब्रा पहिल्या दृष्टीक्षेपात लक्षात घेतलेले लोक हे आदर्श नेते आहेत. त्यांना वर्चस्व आणि नम्रता यांच्यात संतुलन कसे साधायचे हे माहित आहे. ते स्वत: ची वास्तविकता आणि इतरांशी नातेसंबंध या दोन्ही गोष्टींना हात घालू शकतात.
केवळ 5 टक्के लोकांनी सिंह आणि झेब्रा दोन्ही पाहिल्याचे नोंदवले.

झेब्रावर बसलेला पक्षी

तपशिलात पाहण्याची दृष्टी असलेल्या परिपूर्णतावादी व्यक्तींनी सिंहाच्या उजव्या डोळ्याखाली, मध्यभागी झेब्राच्या नाकावर पक्षी बसलेला पाहिला.
“तुम्हाला गोष्टी व्यवस्थित असणे आवडते आणि तुम्हाला वाटते की तुम्ही जे काही करता ते जोपर्यंत ते परिपूर्ण नाही तोपर्यत योग्य नाही,” हा एक प्रकारचा सर्वकाही किंवा काहीच नाही अशा प्रकारचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आहे. अर्थातच ही काही चांगली बाब नाही. परंतु हा दृष्टीकोन कधीकधी जबरदस्त होऊ शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी