optical illusion | मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही डोक्याला ताण द्यायला लावणाऱ्या गोष्टी व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे आपल्या डोळ्यांवर विश्वास न बसणे अथवा आपल्याच डोळ्यांची परीक्षा घेणे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ऑप्टिकल भ्रम तुमच्या डोळ्यांना फसवतात. कारण प्रत्येकाला त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे, जो पाहून भल्या भल्यांना घाम फुटला आहे. कारण या फोटोमध्ये बाहेरील रेषेचा रंग लाल आहे कि निळा यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. (This optical illusion will test your intellect, Is the outer line red or blue).
अधिक वाचा : घरात या ५ वस्तू ठेवल्याने झपाट्याने वाढते धन-संपत्ती
दरम्यान, काही लोकांना लाल किंवा निळा यापेक्षा पुढे काहीतरी वेगळे दिसले. तर काही लोकांना त्यांच्या खोलीत काहीच फरक दिसत नाही. काही लोकांना या ऑप्टिकल इल्युजनकडे पाहता क्षणी लाल बाहेरील रेषा दिसते तर काहींना निळ्या रंगाची बाह्यरेषा दिसते आहे. लक्षणीय बाब म्हणजे टॉम स्टॅफोर्ड नावाच्या संज्ञानात्मक शास्त्रज्ञांनी हा फोटो तयार केला आहे.
टॉम स्टॅफोर्ड यांनी सांगितले की, "परिणामाच्या आकलनामुळे या फोटोमध्ये मोठे फरक आहेत. एक रंग जवळ दिसतो तर दुसरा रंग भिन्न स्वरूपात दिसत आहे." बहुतांश लोकांना यामध्ये लाल रंग दिसतो कारण निळा खोलवर आणि दूरवर दिसतो आहे. असे त्यांनी आणखी म्हटले.
टॉम स्टॅफोर्ड पुढे म्हणाले की, "क्रोमोस्टेरिओपिक इल्युजन हे खरे स्टिरिओ इल्युजन आहे. याचा अर्थ असा होतो की आपल्या स्वतःच्या निष्कर्षावर येण्यासाठी आपल्याला या विशिष्ट ऑप्टिकल भ्रमाकडे दोन्ही डोळ्यांनी पाहावे लागेल. एक डोळा बंद केल्याने परिणाम अदृश्यपणे दिसू शकतो.