मुंबई: बातमीचे हेडिंग वाचून तुम्हीही समजून गेला असाल की बातमी काहीतरी अजबच आहे. तुमच्या मनात नक्कीच असा प्रश्न आला असेल की एक व्यक्ती इतक्या बाळांचा बाप(father) कसा बनू शकतो. आम्ही तुम्हाला हे सांगत आहोत की खोटे नाही तर शंभर टक्के सत्य आहे. ब्रिटनमध्ये(britain) राहणाऱ्या ६६ वर्षीय व्यक्ती एका अजब कारनामा केला आहे. या व्यक्तीची चर्चा सगळीकडे होते आहे आणि लोकही खूप हैराण होतायत हे ऐकून. This person is father 129 baby by sperm donating in Britain
मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीचे नाव क्लायवेस जोन्स आहे. क्लायवेस हे एक रिटायर्ड टीचर आहेत. तेस चॅडेसडेनच्या डर्बीमध्ये राहतात. क्लायवेसबाबत असा खुलासा झाला आहे की ते आतापर्यंत १२९ जणांचे वडील बनले आहेत. तसेच या वर्षात ते आणखी ९ बाळांना जन्म देणार आहेत. आता तुम्ही हा विचार कराल की हे कसं शक्य आहे. क्लायवेस आपले स्पर्म डोनेट करतात. तेही फ्रीमध्ये. रिपोर्टनुसार त्यांनी ५८व्या वर्षापासून स्पर्म डोने करण्यास सुरूवात केली होती.
अधिक वाचा - या जन्मतारखेची लोकं खूप रहस्यमय आणि भावनिक असतात
तेव्हापासून आतापर्यंत ८ वर्षात ते १२९ बाळांचे बाप बनले आहेत. दरम्यान, हा खुलासा झाल्यानंतर हेल्थ तज्ञांनी त्यांना इशाराही दिला आहे की विदाऊट लायसन्स क्लीनिकमध्ये जाऊन त्यांनी हे काम केले आहे. क्लायवेस यांचे म्हणणे आहे की त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकच्या माध्यमातून आपले स्पर्म डोनेट केले आणि याच कारणामुळे अनेक कुटुंबामध्ये आनंद परतला आहे.
क्लायवेस यांचे म्हणणे आहे की मी हे जोपर्यंत दीडशे बाळांचा बाप होत नाही तोपर्यंत करणार आहे. जेव्हा मला लोक मेसेज करतात आणि मुलांचे फोटो पाठवतात तेव्हा मला यामुळे खूप आनंद होतो. आतापर्यंत मी २० बाळांना स्वत: भेटलोही आहे. १९७८मध्ये त्यांनी लग्न केले होते आणि ते आपल्या पत्नीपासून वेगळे झाले आहेत. ब्रिटनमध्ये स्पर्म डोनर होण्याचे जास्तीत जास्त वय हे ४५ वर्षे आहे. या कारणामुळे ते अधिकृत स्पर्म डोनर बनू शकत नाही. त्यामुळे त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून हे काम सुरू केले. १० वर्षांआधी त्यांनी बातम्यांमध्ये याबाबत आर्टिकल वाचले होते. तेथूनच त्यांना स्पर्म डोनेट करण्याची आयडिया सुचली.