मुंबई: जेव्हापासून कोरोना व्हायरसने(Coronavirus Pandemic) आपल्या आयुष्यात एंट्री घेतली आहे तेव्हापासून आपले जीवन त्रस्त झाले आहे. जगातील प्रत्येकजण यामुळे कंटाळला आहे. काहींची गोष्ट वेगळी आहे की त्यांनी या व्हायरसच्या रंगरूपामध्येही क्रिएटिव्हिटी शोधली आहे. २०२०मध्ये कोलकातामध्ये एका दुकनदाराने कोरोना संदेश (Corona Sandesh Sweet) नावाची मिठाई बनवली होती तर एका महिलेने आता कोरोना वडा बनवला आहे. सध्या हा वडा इंटरनेटवर व्हायरल(Corona Vada Viral On Internet) होत आहे. This women makes corona vada which goes on viral on internet
हा वडा ट्विटरवर चांगलीच प्रसिद्धी मिळवत आहे. दिसण्यात तर हा वडा प्रोटीन स्पाईक्स असलेल्या कोरोना व्हायरसच्या फोटो प्रमाणेच आहे. हा वडा तांदूळ आणि बटाट्याने तयार करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण. तुम्हीहा हा व्हिडिओ पाहा की महिलेने कशा प्रकारे हा व्हिडिओ बनवला आहे.
Twitter वर Mimpi नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आाला आहे. या व्हिडिओत एक महिला कोरोना वडा तयार करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ही महिला सगळ्यात आधी तांदळाचे पीठ मळते. त्यानंतर बटाट्यामध्ये टोमॅटो तसेच कांद्याचा मसाला तयार करून स्टफिंग तयार करते. यानंतर या पीठामध्ये बटाट्याचे स्टफिंग भरले जाते. त्यावर ती कच्चे तांदूळ लावले. त्यानंतर ती हे वडे उकडते. जेव्हा उकडल्यानंतर वडे समोर येतात तेव्हा यावर लावलेले हे तांदूळ स्पाईक्सप्रमाणे वर येतात. जणू काही कोरोनाचाच अवतार...
हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, कोरोना वडा, भारत की नारी सबपे भारी. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. तसेच ही नवी डिश पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. लोकांनी या व्हिडिओवर विविध कमेंट केले आहेत. हा दिसण्यास तरी स्वादिष्ट दिसतो मात्र दिसायला एकदम कोरोना व्हायरससारखा दिसतो.