Viral Video : वाघाच्या जवळपास फिरत होती हरणं, वाघाच्या वर्तणुकीमुळे व्हिडीओ होतोय व्हायरल

Tiger Viral Video : वाघ म्हणजे भक्षक. वाघांना पाहून भल्या भल्यांना घाम फुटतो. वाघ जेव्हा शिकार करतो तेव्हा तो प्राण्याची चिरफाड करून लचके तोडतो. परंतु जंगलाचा एक कायदा असतो. भूक लागल्याशिवाय भक्षक शिकारी करत नाही. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. एका वाघाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

tiger viral video
वाघाचा व्हायरल व्हिडीओ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वाघ म्हणजे भक्षक. वाघांना पाहून भल्या भल्यांना घाम फुटतो.
  • वाघ जेव्हा शिकार करतो तेव्हा तो प्राण्याची चिरफाड करून लचके तोडतो.
  • परंतु जंगलाचा एक कायदा असतो. भूक लागल्याशिवाय भक्षक शिकारी करत नाही.

Tiger Viral Video : मुंबई : वाघ म्हणजे भक्षक. वाघांना पाहून भल्या भल्यांना घाम फुटतो. वाघ जेव्हा शिकार करतो तेव्हा तो प्राण्याची चिरफाड करून लचके तोडतो. परंतु जंगलाचा एक कायदा असतो. भूक लागल्याशिवाय भक्षक शिकारी करत नाही. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. एका वाघाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक हरणाची जोडी वाघाच्या मागे जात आहे, परंतु वाघाने त्यांच्यावर हल्ला केला नाही. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून या वाघाचे कौतुक होत आहे. (tiger and deer forest video viral on social media)

अधिक वाचा :  Banana Snake : ही केळी नव्हे तर साप, केळी सारख्या दिसणार्‍या सापाचा व्हिडीओ व्हायरल

भारतीय वन अधिकारी रमेश पांडे यांनी 28 सप्टेंबरला एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा दहा सेकंदाचा व्हिडीओ असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीला आतापर्यंत दीड लाखहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये एक वाघ जंगलात फिरताना दिसात आहे. परंतु या वाघाच्या मागे एक हरणाची जोडी पळताना दिसत आहे. वाघाचे या हरणांकडे लक्ष जाते. परंतु वाघ या हरणांकडे दुर्लक्ष करत आणि आपल्याच धुंदीत चालत राहतो. 

अधिक वाचा : World richest person: फक्त दोन मिनिटांसाठी ही व्यक्ती झाली होती जगात सर्वात श्रीमंत! असा झाला चमत्कार

अनेक ट्विटवर युजर्संनी या व्हिडीओ खाली कमेंट्स केल्या आहेत. आपण माणसं जनावर आहोत अशी प्रतिक्रिया एका ट्विटर युजरने दिली आहे. तसेच मनुष्य लोभी असून त्याला नेहमीच संसाधन कमी पडतात असेही ट्विटरने म्हटले आहे. तर एका ट्विटरने वाघाकडे फ्रीज नाही अशी मिष्किल प्रतिक्रिया दिली आहे. 

अधिक वाचा :Optical illusion Latest : या ऑप्टिकल इल्युजनमध्ये तुम्हाला दुसरा कुत्रा सापडतोय का ते पाहा? 7 सेकंदात कोडे सोडवण्याचे चॅलेंज

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी