Viral Video : वाघ संतापला, पर्यटकाच्या वाहनाचा पाठलाग करू लागला

tiger attacked tourist vehicle driver ran on back gear and save life watch viral video : राजस्थानचे रणथंबोर राष्ट्रीय उद्यान (Ranthambore National Park) वाघांसाठी प्रसिद्ध आहे. या उद्यानात वाघ बघण्यासाठी दरवर्षी गर्दी होते.

tiger attacked tourist vehicle driver ran on back gear and save life watch viral video
वाघ संतापला, पर्यटकाच्या वाहनाचा पाठलाग करू लागला  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • वाघ संतापला, पर्यटकाच्या वाहनाचा पाठलाग करू लागला
  • रागावलेला वाघ पर्यटकांसाठीच्या वाहनावर चाल करून आला
  • व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

tiger attacked tourist vehicle driver ran on back gear and save life watch viral video : राजस्थानचे रणथंबोर राष्ट्रीय उद्यान (Ranthambore National Park) वाघांसाठी प्रसिद्ध आहे. या उद्यानात वाघ बघण्यासाठी दरवर्षी गर्दी होते. पर्यटक जंगल सफारीसाठी तयार केलेल्या विशेष वाहनातून फिरतात आणि जंगलाचे तसेच पशूपक्ष्यांचे फोटो काढतात. व्हिडीओ रेकॉर्ड करतात. वाघ दिसला तर पर्यटकांना प्रचंड आनंद होतो मग वाघाचे फोटो आणि व्हिडीओ करण्यासाठी पर्यटकांची लगबग सुरू होते. पण वाघांना काही वेळा ही लगबग आवडत नाही. जंगलातला निवांतपणा माणूस नावाच्या प्राण्यामुळे नष्ट होत आहे असे वाटले तर संतापलेले वाघोबा लगेच राग व्यक्त करतात. कधी वाहनाचा पाठलाग करतात तर कधी वाहनाचे नुकसान करतात. ताजी घटना रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातच घडली आहे. 

एक पर्यटक पर्यटकांसाठीच्या वाहनात बसून वाघाचे फोटो आणि व्हिडीओ तयार करत होता. हे पाहून निवांत असलेला वाघ संतापला. त्याला निवांतपणा नष्ट करणे आवडले नाही. रागावलेला वाघ पर्यटकांसाठीच्या वाहनावर चाल करून आला. पण वाघाचा इरादा लक्षात येताच चालकाने पटकन रिव्हर्स गिअर टाकून वाहन वेगाने पळवले. अखेर चालक, पर्यटक सुरक्षित अंतरावर पोहोचले. वाघाने पाठलाग करणे सोडून दिले आणि पर्यटक तसेच चालकाने सुटकेचा निःश्वास सोडला.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडीओ बघताना काही जणांना भीती वाटू शकते. जे जंगल सफारीचा विचार करत आहेत त्यांनी हा व्हिडीओ बघितला तर सहल रद्द करू नये. फक्त सहलीत प्राण्यांना कळत नकळत त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी