Tiger attacked woman: सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. त्यातील काही व्हिडिओ हे फक्त मनोरंजनासाठी असतात, तर काही माहितीपूर्ण असतात. काही व्हिडिओ सोशल मीडियात बघता बघता व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ हसवणारे असतात, तर काही विचार करायला लावणारे असतात. काही व्हिडिओ हे मात्र सत्यघटना दाखवणारे असतात. असाच एक भयंकर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका महिलेवर वाघाने अचानक घातलेली झडप (Tiger Attacked) आणि तिला फरफटत जंगलात घेऊन गेल्याचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
हा व्हिडिओ चीनमधील असल्याचं सांगितलं जात आहे. चीनच्या जंगलाच्या परिसरात असणाऱ्या रस्त्यावरून एक कुटूंब चाललं होतं. या कुटुंबातील एक महिला गाडीतून रस्त्यावर उतरते. काही वेळातच ती पुन्हा गाडीत बसण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी गाडीचा दरवाजा उघडून ती आत बसण्याच्या तयारीत असते. मात्र तेवढ्यात एक वाघ अचानक तिच्यावर झडप घातलो आणि तिला पकडतो. नेमकं काय घडतंय, हे त्या महिलेलाही कळत नाही. या महिलेला आपल्यावर वाघ हल्ला करत आहे, हे समजायलाही वेळ मिळत नाही. काही क्षणांतच वाघ आपलं काम करतो आणि तिला खेचत जंगलात घेऊन जातो.
अधिक वाचा - किंग कोब्राची टूर टूर, आठवड्यानंतर कोब्राची घरवापसी
गाडीतून उतरलेली महिला गाडीत बसत असतानाच वाघ आपला डाव साधत महिलेवर हल्ला करतो आणि तिला आपल्या तावडीत घेतो. गाडीतील इतर सदस्यांनाही काय सुरु आहे, हे समजण्याच्या आत वाघ तिथून निघून गेलेला असतो. आपल्या कुटुंबातील महिलेला वाघाने पकडल्याचं पाहून गाडीतील एक सदस्य तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो. मात्र वाघासमोर काय करावं, हे त्याला काही क्षण समजतच नाही. त्याला काही सुचण्याअगोदरच वाघ तिथून माघारी फिरतो आणि जाताना सोबत महिलेलाही आपल्यासोबत घेऊन जातो. अचानक झालेल्या या हल्ल्याने सारेच भयचकित होतात आणि गाडीतून खाली उतरतात. मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. वाघ महिलेला घेऊन जंगलात गायब झालेला असतो.
अधिक वाचा - Chip implanted in hand: सारखं सारखं खिशातून ATM Card काढण्याचा कंटाळा, हातातच बसवली चिप
हा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. आता हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. वाघाने महिलेवर चढवलेला हल्ला आणि त्यात महिलेची झालेली अवस्था पाहून सर्वांनीच दुःख व्यक्त केलं आहे. जंगलाच्या परिसरात गाड्या थांबवू नयेत आणि गाडीतून खाली उतरू नये, असे सूचनाफलक सर्वत्र लिहिलेले असतात. मात्र अनेकजण या नियमांचं पालन करत नाहीत. त्याचा काय परिणाम होऊ शकतो, हे या व्हिडिओतून दिसून येत आहे. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.