VIDEO: अभयारण्यात बाईकस्वाराच्या मागे लागला वाघ आणि मग...

व्हायरल झालं जी
Updated Jul 01, 2019 | 16:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

VIRAL VIDEO: अभयारण्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वाघ मोटरसायकलस्वाराचा पाठलाग करताना आपल्याला दिसत आहे. हा व्हिडिओ वायनाडमधील असल्याचं समोर आलं आहे.

Tiger chases bike rider
जेव्हा बाईकस्वाराच्या मागे लागतो वाघ...  |  फोटो सौजन्य: Facebook

वायनाड: गेल्या वर्षी महाराष्ट्रातील ताडोबा अभयारण्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियात खूपच व्हायरल झाला होता. या व्हिडिओत एक वाघ पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग करताना दिसलं होतं. १९ सेकंदांच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये वाघ मारुती जिप्सीचा पाठलाग करत होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ केरळमधील मुथांगा अभयारण्यातील आहे. या व्हिडिओत सुद्धा एक वाघ बाईकस्वाराचा पाठलाग करताना दिसत आहे.

या घटनेचा व्हिडिओ वन आणि वन्यजीव संरक्षण सोसायटी (FAWPS) ने फेसबुकवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३,८०० जणांनी शेअर केला आहे आणि ४०० हून अधिक युजर्सने यावर कमेंट्स केल्या आहेत. तसेच १,४५,८२४ युजर्सने हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये एक वाघ बाईकस्वाराचा पाठलाग करताना दिसत आहे.

जेव्हा बाईकस्वाराच्या लक्षात आलं की, वाघ आपल्या दिशेने धावत येत आहे तेव्हा त्याने तात्काळ आपल्या बाईकचा स्पीड वाढवला. बाईकस्वाराने गाडीच्या स्पीड वाढवताच वाघानेही आपला मार्ग बदलला आणि जंगलाकडे रवाना झाला. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, या घडलेल्या घटनेच्या संदर्भात अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, बाईकस्वार हे वन विभागाचे कर्मचारी असल्याचं समोर आलं आहे.

रिपोर्टनुसार, वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना हा प्रकार घडला आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर फेसबुक युजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा वाघ खूप मोठा असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. 

यापूर्वी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या ताडोबा अभयारण्यात सुद्दा असाच प्रकार घडला होता. या व्हिडिओत एक वाघ जिप्सीचा पाठलाग करताना दिसत होता. हा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी