Horror Video : घनदाट जंगलात कारमधून उतरली महिला, वाघाने हल्ला करून नेलं पळवून, हा भयंकर व्हिडिओ पाहून उडेल काळजाचा थरकाप

जंगलातून प्रवास करताना वाटेत वाहन थांबवू नका आणि उतरू नका, अशी सूचना देण्यात येते. मात्र काहीजण याचं उल्लंघन करतात. त्याचा काय परिणाम होऊ शकतो, हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Horror Video
कारमधून उतरलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जंगलातील रस्त्यावर महिला कारमधून उतरली
  • वाघाने झडप घालून फरफटत नेले जंगलात
  • घटनेचा व्हिडिओ पाहून बसेल धक्का

Horror Video | प्रवास करत असताना भर जंगलात गाडी थांबवून एक महिला खाली उतरली. गाडीच्या उजव्या बाजूने ती खाली उतरली आणि डाव्या बाजूकडे चालत गेली. तेवढ्यात दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला आणि तिला पकडून तो जंगलात घेऊन गेला. हे सगळं इतक्या वेगाने घडलं की कारमधील तिच्या नातेवाईकांना काही करायला वेळही मिळाला नाही. 

जंगलातून आणि घनदाट झाडीतून प्रवास करायला अनेकांना आवडतं. मात्र ज्या जंगलात हिंस्र पशू असतात, तिथे सावधानतेचा इशारा देण्यात येतो. जंगलाच्या क्षेत्रात कुणीही आपल्या वाहनातून खाली उतरू नये, अशा सूचना देण्यात आलेल्या असतात. किंबहूना वाटेत कुठेही गाडी न थांबवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून काही प्रवासी वाटेत गाडी थांबवतात आणि संकट ओढावून घेतात. या महिलेच्या बाबतीतही असंच घडल्याची चर्चा आहे. 

पतीसोबत झालं भांडण

कारमधून प्रवास करताना या महिलेचं पतीसोबत भांडण झाल्याची चर्चा आहे. काही वेळ पतीसोबत तिचं भांडण सुरू होतं. हे भांडण वाढत गेलं. भांडणाला सुरुवात झाली तेव्हा महिला कार ड्राईव्ह करत होती. एका क्षणी पतीसोबतच्या भांडणानं कळस गाठला आणि महिलेनं वाटेतच कार थांबवली. कारमधून ती उतरली आणि रस्त्यावर आली. ड्रायव्हिंग सीटवरून उतरून कदाचित पाठीमागे बसण्याचा तिला विचार होता. 

अधिक वाचा - Rabbit Fights Tiger : आता ससा आणि वाघाच्या गोष्टीची चर्चा, हा व्हिडिओ बघून तुम्हालाही मिळेल प्रेरणा

वाघाने घातली झडप

ही महिला कारच्या उजव्या बाजूने खाली उतरली आणि डाव्या बाजूला गेली. तिथे जाऊन कारचं त्या बाजूचं दार उघडण्यापूर्वीच वाघाने तिच्यावर झडप घातली. वाघाने आपले पुढचे दोन पाय उचलून महिलेला पकडलं आणि तिचा फरफटत जंगलात नेलं. या प्रकाराने तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला. काही क्षण काय घडतंय हेच त्यांना कळेना. वाघाने झडप घातल्यानंतर महिलेला वाचवण्यासाठी तिचा पती आणि सासू कारमधून खाली उतरले आणि त्यांनी धावपळ करून तिला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडिओत दिसतं. मात्र वाघाने ज्या वेगाने महिलेला पकडून जंगलात धाव घेतली, त्यापुढे तिचे कुटुंबीय काहीच करू शकले नाहीत. 

अधिक वाचा - Drunk Groom : दारुच्या नशेत धुंद होता नवरदेव, पत्नीऐवजी मेहुणीलाच घातली वरमाला, VIDEO होतोय व्हायरल

सर्वांना जबर धक्का

ही घटना घडली, तेव्हा रस्त्यावर अनेक कार उभ्या होत्या. महिलेनं रस्त्याच्या मधोमध आपली कार थांबवली होती. त्यामुळे त्या कारच्या मागे इतर गाड्यांची रांग लागली होती. मात्र यापैकी कुणीच महिलेला वाचवू शकलं नाही. चीनच्या एका जंगलातील हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून तो पाहणाऱ्यांना चांगलाच धक्का बसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी