Tiger killed dog : जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांसमोर वाघाने केली कुत्र्याची शिकार, अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ व्हायरल

Tiger killed dog वाघाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात वाघ एका कुत्र्याची शिकार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहे, कारण वाघाने अतिशय हिंसक पद्धतीने कुत्र्यावर हल्ला केला आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

tiger killed dog
वाघाकडून कुत्र्याची शिकार  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • वाघाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
  • वाघ एका कुत्र्याची शिकार करताना दिसत आहे.
  • वाघाने अतिशय हिंसक पद्धतीने वाघावर हल्ला केला आहे.

Tiger killed Dog : जयपूर : सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे गोंडस प्राण्यांचे असतात. या व्हिडीओंना लाखोक शेअर आणि कमेंट्स असतात. पण काही व्हिडीओ हे तितकेच भयानक आणि हिंसक असतात. असाच एक वाघाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात वाघ एका कुत्र्याची शिकार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहे, कारण वाघाने अतिशय हिंसक पद्धतीने कुत्र्यावर हल्ला केला आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

वाघ आणि इतर वन्य प्राण्यांना पाहण्यासाठी लोक जंगल सफारीला निघतात. कधी कधी वाघ दिसतो तर कधी नाही. परंतु वाघ हा शिकार करणारा प्राणी आहे. शिकार करताना तो अतिशय हिंसक होतो. आणि असे काही दृश्य पर्यटकांच्या दृष्टीस पडल्यास ते हरकून जातात. राजस्थानच्या रनथम्बौर राष्ट्रीय उद्यानातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात काही पर्यटक व्याघ्रदर्शनासाठी निघाले होते. तेव्हा एका वाघाने एका कुत्र्याची शिकार केली. या व्हिडीओ मध्ये वाघाने कुत्र्यावर झडप घातली असून त्याचा फडशा पाडला आहे.

पर्यटकांनी आपल्या डोळ्यांसमोर ही कुत्र्याची शिकार पाहिली. वाघ जेव्हा कुत्र्याची शिकार करत होता तेव्हा काही उपस्थित पर्यटक घाबरूनच गेले. '@anishandheria या ट्विटर युजरने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ४० हजार व्ह्युज मिळाले आहेत तसेच कमेंट करून प्रतिक्रियाही देत आहेत. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी