Tik Tok वरील मैत्री पडली महागात, क्षुल्लक कारणावरुन महिलेची हत्या

Man killed woman: ग्रेटर नोएडामध्ये एका व्यक्तीनं एका महिलेची हत्या केली आहे. टिक टॉक आणि लाइकी अॅपवर दोघांची मैत्री झाली होती.

Tik Tok
Tik Tok करु नका मैत्री, नाहीतर पडू शकते महागात 

नवी दिल्लीः उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला आहे.  टिक टॉकवर बनलेल्या मित्रानं महिलेची हत्या केल्याचं बोललं जात आहे. पोलीस अधिकाऱ्यानं टिक टॉक स्टारला अटक केली आहे. महिला एनटीपीसी (National Thermal Power Corporation) च्या डीजीएमची पत्नी आहे. जी बिसारख भागातल्या अरिहंत आर्डन सोसायटीमध्ये राहत होती. तिचा मृतदेह गुरुवारी रात्री आढळला.

जेव्हा तिचा मुलगा संध्याकाळी 8 वाजता कामावरुन परत आला तेव्हा घराचा दरवाजा आतमधून बंद होता. खूप वेळ घराची बेल वाजवली, पण आतमधून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. तेव्हा दुसऱ्या रस्तानं त्यानं घरात प्रवेश केला. तेव्हा घरात त्यानं पाहिलं त्यामुळे त्याला धक्काच बसला. घरात त्याचा आईचा मृतदेह पडला होता. ज्यानंतर त्यानं पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी सहा तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटली. ज्यात त्याच रात्री आरोपी घरातून बाहेर पडताना दिसत होता. 

अडीच वर्षांपूर्वी टिक टॉकवर झाली होती मैत्री 

याव्यतिरिक्त पोलिसांना तपासादरम्यान महिलेच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बरेच पुरावे मिळाले होते. ज्यानंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना मदत झाली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 20 वर्षांच्या जवळपास असणारा राघव कुमार दिल्लीच्या पीरागढीचा राहणारा आहे. दोन वर्षांपूर्वी त्याची महिलेसोबत लाइकी आणि टिक टॉक अॅपवर मैत्री झाली. त्यापासून दोघांची मैत्री इतकी वाढली की, राघवचं नेहमी तिच्या घरी येणं- जाणं वाढलं. 

महिलेकडून मागितले होते 5 हजार 

घटना घडली त्या दिवशी दोघांमध्ये पैशावरुन भांडण झालं होतं. त्यानंतर त्यानं महिलेची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्यानं महिलेचा फोन आणि घराची चावी घेऊन फरार झाला. पोलिसांनी दोघांचे सोशल अकाऊंट तपासल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपी राघवविरोधात भारतीय दंड संहिता 302 कलमांतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 

पाचवी पास आहे आरोपी

मृत महिला एनटीपीसीच्या डीजीएमची पत्नी होती. महिलेची आरोपीसोबत अडीच वर्षांपूर्वी पहिल्यांदा सोशल मीडियाच्या आधारे भेट झाली होती. चौकशीदरम्यान आरोपीनं महिलेकडून पाच हजार रुपयांची मागणी केली होती. ज्यासाठी महिलेनं नकार दिला होती. त्यानंतर त्यानं तिची हत्या केली. हैराण करणारी गोष्ट म्हणजे, आरोपी हा पाचवी पास आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी