Tik Tok वर ४० हजाराहून जास्त फॉलोवर्स असलेला स्टार निघाला चोर! 

सोशल मीडिया अॅप टिक टॉकवरील प्रसिद्ध स्टार शाहरुख याला ग्रेटर नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. कारण खऱ्या आयुष्यात तो एक चोरटा आहे. जो लोकांचे फोन आणि इतर वस्तू चोरायचा. 

TIK_TOK_STAR
(टिक-टॉक) 

थोडं पण कामाचं

  • टिक-टॉक वर प्रसिद्ध असलेल्या एका स्टारला पोलिसांनी अटक केली आहे.
  • टिक-टॉकवर व्हिडिओ शेअर करणारा निघाला भुरटा चोर
  • मित्रांच्या मदतीने अनेकांना लुटणारा चोर पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली: सोशल मीडिया अॅप टिक टॉक सध्या प्रचंड चर्चेत आहे. याच अॅपच्या माध्यमातून लोकं आपलं टॅलेंट दाखवण्याचा प्रयत्न करतात. अनेकांना तर याच अॅपमुळे प्रचंड प्रसिद्धी देखील मिळाली आहे. असाच एक उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथील २३ वर्षीय टिक टॉक स्टार शाहरुख हा तरुण सोशल अॅपवर बराच प्रसिद्ध झाला होता. पण आता हाच तरुण प्रचंड चर्चेत आला आहे.  याची खरं तर दोन कारणं आहेत. एक म्हणजे तो टिक टॉकवर प्रचंड प्रसिद्ध आहे. तर दुसरं कारण म्हणजे सध्या तो पोलिसांच्या नजरेत आला आहे. कारण की, आतपर्यंत त्यांने केलेले सर्व कारनामे हे उघड झाले आहेत. ज्यामुळे पोलिसांनी त्याला काल (बुधवार) ग्रेटर नोएडामधून अटक केली आहे.  

शाहरुखने आपल्या तीन मित्रांसोबत मागील सहा महिन्यांपासून चोऱ्या करत होता. त्याने अनेक रस्त्याने जाणाऱ्या लोकांचे फोन आणि पैसे चोरले होते. अनेक लोकांनी याबाबत पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी जेव्हा तपास सुरु केला तेव्हा त्यांना या चोऱ्यांबाबत काही पुरावे सापडले. ज्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला. 

 

 

याप्रकरणी पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख, आसिफ, फैजान आणि मुकेश या चार जणांना पोलिसांनी तात्काळ अटक केली. सुरुवातीला पोलिसांना या चौघांवर फक्त संशय होता. पण नंतर चौकशीदरम्यान त्यांनी मान्य केलं होतं की, त्यांनी गौतम बुद्ध नगरमधून जवळजवळ सहा चोऱ्या केल्या होत्या. पोलिसांनी या चोरट्यांकडून मोबाइल फोन, बाइक आणि कॅश जप्त केली आहे. 

आरोपी शाहरुख, आसिफ आणि फैजाना हे तिघेही उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथेच राहणारे आहेत. या गँगमधील शाहरुख हा उत्तम डान्सर आहे. त्यामुळे अनेकदा तो आपले डान्सचे व्हिडिओ टिक टॉकवर शेअर करायचा. त्यामुळे टिक टॉकवर तो बराच प्रसिद्ध झाला होता. म्हणूनच त्याला हजारो जण फॉलो देखील करत होते. 

 

 

शाहरुखला अटक केल्यानंतर पोलिसांनी याबाबत माहिती देताना असं सांगितलं की, 'शाहरुख पहिलेच आपलं शिकार हेरुन ठेवायचा. संधी मिळताच तो त्यांना लुटायचा. त्यानंतर त्यातून मिळालेले पैसे तो आपल्या मित्रांमध्ये वाटायचा. टिक टॉकच्या सवयीमुळे मागील काही दिवसांपासून तो बऱ्याचदा महागडे फोन देखील खरेदी करायचा.' 

दरम्यान, शाहरुखला अटक केल्यानंतर त्याचा खरा चेहरा जगासमोर आलं आहे. त्यामुळे आभासी जगात जो आपल्याला हिरो वाटत होता तोच आता खरा विलन ठरला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...