नऊ बायकांना आनंद देण्यासाठी बनवलं टाइम टेबल, पण 'या' गोष्टीमुळे नवराबोचं झाला दुखी

 एक बायको (Wife) केली तरी माणसांना मोठं टेन्शन असतं. तिची लाली-लिपिस्टीक, पावडर, साडी, वाढदिवस या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवत ठेवत अनेक नवरोबांचा(Husband) घाम निघत असतो. तर विचार करा एक बायकोऐवजी तुमच्या 9 बायका असल्या तर.. आनंदी झालात ना अहो, नऊ बायका असणं हे फक्त ऐकायला चांगलं वाटतं किंवा कल्पना करायला चांगलं. परंतु वास्तविकता फार वेगळी.

viral
9 बायकांच्या प्रेमासाठी बनवलं टाइम टेबल, पण...  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • नऊ बायकांना आनंद देण्यासाठी ऑरर्थने बनवलं प्रेमाचं वेळापत्रक
  • बायकांना गिफ्ट मिळालं नाहीतर त्या नाराज होत एकमेंकांचा हेवा करतात मत्सर करतात.
  • वेळापत्रक बनवल्यानं प्रेमात आनंद राहिला नाही.

ब्राझील :  एक बायको (Wife) केली तरी माणसांना मोठं टेन्शन असतं. तिची लाली-लिपिस्टीक, पावडर, साडी, वाढदिवस या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवत ठेवत अनेक नवरोबांचा(Husband) घाम निघत असतो. तर विचार करा एक बायकोऐवजी तुमच्या 9 बायका असल्या तर.. आनंदी झालात ना अहो, नऊ बायका असणं हे फक्त ऐकायला चांगलं वाटतं किंवा कल्पना करायला चांगलं. परंतु वास्तविकता फार वेगळी. सर्व बायकांना घेऊन एकाच घरात राहणं म्हणजे रणभूमीत वास्तव्याला जाण्यासारखंचं असतं. अशीच काहीशी परिचिती ब्राझीलमधील आर्थर ओ (arthur o urso) ला येत आहे. 

आर्थर ओ उर्सोने एकाचवेळी 9 मुलींसह लग्न केलं. सर्व पत्नींना वेळ देता यावा, त्यांना आनंदी ठेवता यावे यासाठी आर्थर ओने योजना बनवून एक टाइम टेबल बनवलं. परंतु व्यक्तीच्या एवढ्या प्रयत्नांनंतरही ' प्रेमाचं टाइम टेबल'ची योजना प्रभावी ठरली नाही. ब्राझीलचा रहिवासी असलेला आर्थर ओ उर्सो 9 महिलांसोबत लग्न करून जगभर चर्चेत आला होता. आपल्या  प्रेमाच्या टाईम टेबल' विषयी बोलताना तो म्हणाला की,  हे निरुपयोगी असल्याचे त्यांनी सांगितले. तो म्हणाला- आपल्या आयुष्यात खूप मजा आणि आनंद असतो. पण सुरुवातीला भेटीची वेळ देऊन प्रेम करण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळापत्रकाचे पालन केल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या.  

कधी कधी वाटायचं की वेळापत्रकामुळे मला प्रेम करावं लागतं आहे, हा एक प्रकारचा दबाव वाटत होता. असं वाटत होतं की मी हे आनंदासाठी करत नाहीये. दरम्यान आपल्या नऊ लग्नांविषयी बोलताना आर्थर म्हणाला की,  त्याने मुक्त प्रेम करण्यासाठी आणि मोनोगॅमीला विरोध करण्यासाठी 9 मुलींसह लग्न केलं. सामान्यतः कोणत्याही विवाहात घडतात त्याप्रमाणे, आर्थरच्या वैवाहिक जीवनातही अनेक चढउतार होते. त्याच्या एका पत्नीने घटस्फोट घेण्याचे ठरवले आहे. आर्थर म्हणाला - मी फक्त तिचाच व्हावे, अशी तिची इच्छा आहे. पण त्याला काही अर्थ नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arthur O Urso (@arthurourso)

आर्थर म्हणाला - जेव्हा तुम्हाला खूप बायका असतात तेव्हा लक्ष किंवा आपुलकी यायला जास्त वेळ लागत नाही. परंतु टाइम टेबल रोमान्स हे आमच्यासाठी योग्य नव्हता. म्हणून आम्ही त्याला थांबवले. आर्थरचा असा विश्वास आहे की त्याने कोणत्या बायकोसोबत जास्त वेळ घालवला या गोष्टीचा कोणत्याच बायकोवर परिणाम होत नाही. मात्र, भेटवस्तूंबाबत पत्नींमध्ये मत्सर आहे. तो म्हणाला- जेव्हा मी एकाला महागडे गिफ्ट देतो आणि दुसर्‍याला लहान किंवा स्वस्त देतो तेव्हा त्यामुळे त्यांच्यात मत्सर निर्माण होतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी