गर्लफ्रेंडच्या धूर्तपणाला कंटाळून प्रियकराने केले ब्रेकअप, पत्रात लिहंल... मोठा भाऊ म्हणून माफ कर!

Breakup Letter By Boyfriend: सध्या सोशल मीडियावर एक पत्र खूपच व्हायरल होत आहे. ज्या पत्रात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला तिच्या धूर्तपणामुळे ब्रेकअप करत असल्याचं सांगितलं आहे. तसेच तो भविष्यात तिचा मोठा भाऊ असेल असंही या पत्रात म्हटलं आहे. जाणून घ्या या पत्रात नेमकं काय-काय म्हटलं आहे.

tired of girlfriends cunning boyfriend did breakup and  write a open letter
'मोठा भाऊ म्हणून माफ कर', प्रियकर प्रेयसीला असं का म्हणाला?  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • प्रेयसीच्या धूर्तपणाला कंटाळून प्रियकराने केलं अनोख्या पद्धतीने ब्रेकअप
  • प्रियकराने गर्लफ्रेंडला लिहिले ब्रेकअपचे पत्र
  • पत्रात स्वत:ला गर्लफ्रेंडचा भाऊ असल्याचं केलं नमूद

Breakup Letter By Boyfriend: प्रेम हा एक अतिशय सुंदर शब्द आहे, परंतु जेव्हा प्रेमावरुन एखाद्या व्यक्तीचा भरोसा तुटतो तेव्हा ती गोष्ट त्या व्यक्तीच्या मनाला खूपच लागते. असाच काहीसा प्रकार एका प्रियकरासोबत घडला आहे.  जेव्हा एका प्रियकराला त्याच्या प्रेयसीच्या धूर्तपणाबद्दल सारं काही समजलं तेव्हा त्याने थेट आपल्या प्रेयसीसोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. पण तिला हा निर्णय त्याने कसा कळवला ते माहितीए? तर सरळसरळ पत्र लिहून. 

या ब्रेकअप लेटरमध्ये प्रियकराने अशा काही गोष्टी लिहिल्या आहेत, ज्या वाचून तुम्ही देखील विचारात पडाल. तसंच तुम्हाला तुमचं हसूही आवरता येणार नाही.

अधिक वाचा: Weird Job Advertisement : केवळ आळशी आणि दुःखी लोकांसाठी नोकरीची संधी, अट फक्त एकच

हे ब्रेकअप लेटर सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. हे ब्रेकअप लेटर एका प्रियकराने त्याच्या गर्लफ्रेंडसाठी लिहिले होते. बॉयफ्रेंडही या पत्रात स्वत:ला चक्क प्रेयसीचा मोठा भाऊ असल्याचं म्हणतो आणि ब्रेकअपसाठी माफीही मागतो. 

पत्रात अशा मजेशीर गोष्टी लिहिल्या आहेत की, त्या वाचून तुम्हाला हसू येईल. आता हे ब्रेकअप लेटर सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केले जात आहे. यावर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

अधिक वाचा: Drunk Groom : दारुच्या नशेत धुंद होता नवरदेव, पत्नीऐवजी मेहुणीलाच घातली वरमाला, VIDEO होतोय व्हायरल

प्रेयसीच्या धूर्तपणामुळे त्रस्त होता बॉयफ्रेंड

सुजान नावाच्या बॉयफ्रेंडने हे ब्रेकअप लेटर त्याची गर्लफ्रेंड सुप्रिया हिला लिहिले होते. यात त्याने लिहिले की, 'माझ्या प्रिय गर्लफ्रेंड 21व्या शतकात माझ्यासारख्या मुलाची तुझ्यासारख्या हुशार मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये राहण्याची हिंमत नाही. म्हणूनच दोघांमधील नाते इथेच संपावे असे मला वाटते. जर माझ्याकडून काही चूक झाली असेल, तर तुझा मोठा भाऊ समजून मला तू माफ कर.' चक्क असं प्रियकाराने पत्रात लिहलं आहे.

सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे मुलाने पत्राच्या शेवटी असं लिहलं आहे की, 'तुझा पूर्वाश्रमीचा प्रियकर आणि भविष्यातील मोठा भाऊ.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by memes comedy (@ghantaa)

अधिक वाचा: Rabbit Fights Tiger : आता ससा आणि वाघाच्या गोष्टीची चर्चा, हा व्हिडिओ बघून तुम्हालाही मिळेल प्रेरणा

सध्या बॉयफ्रेंडचे हे ब्रेकअप लेटर सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. ब्रेकअपचे हे पत्र ghantaa नावाच्या अकाऊंटवरून इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहे. 

हे पत्र वाचून नेटिझन्स तुफान कमेंट्स करत आहेत. त्याला आतापर्यंत 83 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. हे पत्र पाहून एका यूजरने लिहिले की, 'शाब्बास बरं झालं ब्रेकअप केलंस. नाहीतर लग्नानंतर लिहिलं असतं तर हॅशटॅग झाला असता.'

दरम्यान, हे पत्र किती खरं आहे किती खोटं याची नेमकी सत्यता समोर आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर यूजर्स हे पत्र फार मजेशीरपणे वाचत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी