शोरुमध्ये गौ- मातेचा जोरदार तांडव; बिघडवला शोरुमचा शो, पहा व्हिडिओ

प्राण्यांना राग आला तर ते जबरदस्त तांडव करत असतात. अनेकवेळा सामानाचे मोठे नुकसान करत असतात. अशाच एका गायीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

today viral video cow destroy showroom viral google trend video
शोरुमध्ये गौ- मातेचा जोरदार तांडव  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गौ-मातेने थेट एका शोरुम मध्ये धुमाकूळ घालत दुकानातील वस्तूची नासधूस केली आहे.
  • मोबाईल फोनच्या शोरूममध्ये गायीचे तांडव

नवी दिल्ली : प्राण्यांना राग आला तर ते जबरदस्त तांडव करत असतात. अनेकवेळा सामानाचे मोठे नुकसान करत असतात. अशाच एका गायीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या गौ-मातेने थेट एका शोरुम मध्ये धुमाकूळ घालत दुकानातील वस्तूची नासधूस केली आहे. गाईचे हे तांडव पाहून दुकानातील व्यक्तींना बाहेर पळवून लावलं. हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमधील एक गाय पळत-पळत थेट शोमरुमध्ये शिरली. अचानक शोरुममध्ये गाय आल्याचे पाहून दुकानातील सर्व कामगारांमध्ये पळा-पळ सुरू झाली. कामगारांना पाहून गायीने दुकानातील वस्तूंचे नुकसान केले. दुकानातील टेबल देखील अस्तवस्त करत गाईने दुकानातील कामगारांही दुकानाच्या बाहेर पळवून लावले. परंतु कामगार गाईला बाहेर घालवण्यास यशस्वी होत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसते. 

शोरुमचा बिघडवला शो

व्हिडिओ पाहून असे वाटते की ते मोबाईल फोनचे शोरूम आहे. ज्याला गाईने शिकार केले. जेव्हा गाय शोरूमच्या बाहेर येते तेव्हा लोक तिला पाहून पळून जातात. संपूर्ण प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हा व्हिडिओ  सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांकडून शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ भारतीय पोलीस सेवा अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि त्याचा आनंद घेत कमेंट करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, 'मजा करा'. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, 'हे फक्त रायता पसरवण्याबद्दल होते'.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी