Viral Video : किचनमध्ये तयार केले जगातले सर्वात स्वस्त आणि प्रभावी ट्रेडमिल

Treadmill viral Video, Treadmill made without spending money : सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका व्यक्तीने किचनमध्ये तयार केलेले जगातले सर्वात स्वस्त आणि प्रभावी ट्रेडमिल दिसत आहे.

Treadmill viral Video
किचनमध्ये तयार केले जगातले सर्वात स्वस्त आणि प्रभावी ट्रेडमिल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • किचनमध्ये तयार केले जगातले सर्वात स्वस्त आणि प्रभावी ट्रेडमिल
  • व्हिडीओ वेगाने व्हायरल
  • किचनमध्ये कसे तयार केले ट्रेडमिल?

Treadmill viral Video, Treadmill made without spending money : सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका व्यक्तीने किचनमध्ये तयार केलेले जगातले सर्वात स्वस्त आणि प्रभावी ट्रेडमिल दिसत आहे. किचनमधील ट्रेडमिलला बघून अनेकांनी व्हिडीओ तयार करणाऱ्याच्या कल्पकतेचे कौतुक केले आहे.

व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी किचनमधील ट्रेडमिलचे कौतुक केले आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही किचनमध्ये ट्रेडमिल तयार करणाऱ्याच्या कल्पकतेचे कौतुक केले आहे. जगातले सर्वात स्वस्त आणि प्रभावी ट्रेडमिल असल्यामुळे या ट्रेडमिलला मोठी मागणी येऊ शकते असे मत काही जणांनी प्रतिक्रियेच्या स्वरुपात व्यक्त केले आहे. 

महसूल अधिकाऱ्याने बजेट फोटोशूटसाठी सुचविली जागा, सजेशन झाले व्हायरल

Viral Video : नाचता नाचता Heart Attack आल्यामुळे महिलेचा मृत्यू

किचनमध्ये कसे तयार केले ट्रेडमिल?

व्हिडीओत एक तरुण किचनमध्ये जगातले सर्वात स्वस्त आणि प्रभावी ट्रेडमिल तयार करताना दिसत आहे. ट्रेडमिल तयार करण्यासाठी तरुणाने ओंजळीत थोडा भांडी घासण्याचा लिक्विड सोप घेतला. हा लिक्विड सोप त्याने किचनच्या जमिनीवर पसरवला. नंतर जमिनीच्या त्या भागावर थोडे पाणी शिंपडले. यामुळे किचनमध्ये निसरडे झाले. यानंतर तरुण ट्रेडमिल ऑपरेट करण्यासाठी उभे राहतात तसा उभा राहिला. नंतर त्याने ट्रेडमिलची बटणे दाबावी तशी कृती केली. यानंतर तरुणाने किचनच्या जमिनीवरील निसरड्याचा सुरेख वापर केला आणि ट्रेडमिलवर पायांची हालचाल करतात तशी कृती सुरू केली. तो सराईतपणे ट्रेडमिलवर व्यायाम करावा तशा पद्धतीने किचनच्या जमिनीवरच आरामात व्यायाम  करू लागला. या अनोख्या ट्रेडमिलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ बघून उद्योगती आनंद महिंद्रा यांनीही तरुणाच्या कल्पकतेचे कौतुक केले. तरुणाला संशोधनासाठी पुरस्कार द्यायला हवा, असेही महिंद्रा म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी