Viral Video: नाताळच्या दिवशी चुकून दिली पोपच्या मृत्यूची बातमी

TV presenter wrongly announced Pope's death on Christmas Day : नाताळच्या दिवशी म्हणजे २५ डिसेंबर रोजी एका वृत्त निवेदिकेने मोठी चूक केली. या चुकीचा व्हिडीओ अल्पावधीत व्हायरल झाला. वृत्त निवेदिकेने बातमी सांगताना चुकून पोप फ्रान्सिस यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

TV presenter wrongly announced Pope's death on Christmas Day
नाताळच्या दिवशी चुकून दिली पोपच्या मृत्यूची बातमी 
थोडं पण कामाचं
  • नाताळच्या दिवशी चुकून दिली पोपच्या मृत्यूची बातमी
  • वृत्त निवेदिकेने मागितली माफी
  • वृत्त निवेदिकेच्या चुकीचा व्हिडीओ व्हायरल

TV presenter wrongly announced Pope's death on Christmas Day, short video clip has now gone viral : नवी दिल्ली : वृत्त वाहिनीवर (न्यूज चॅनल News Channel) बातम्या सांगताना वृत्त निवेदकाकडून किंवा वृत्त निवेदिकेकडून चूक झाल्याचे आपण बघितले-ऐकले असेल. बातम्या वेगाने देताना नकळतपणे चुका होतात. यातल्या काही चुकांचे व्हिडीओ नंतर व्हायरल होतात. नाताळच्या दिवशी म्हणजे २५ डिसेंबर रोजी एका वृत्त निवेदिकेने मोठी चूक केली. या चुकीचा व्हिडीओ अल्पावधीत व्हायरल झाला.

वृत्त निवेदिकेने बातमी सांगताना चुकून पोप फ्रान्सिस यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. आपण चुकीचे वक्तव्य केले याची जाणीव होताच वृत्त निवेदिकेने लगेच माफी मागितली आणि पुढे व्यवस्थित बातमी सांगितली. पण वृत्त निवेदिकेच्या चुकीचा व्हिडीओ अल्पावधीत व्हायरल झाला. आयटीव्ही या वृत्त वाहिनीच्या वृत्त निवेदिकेच्या बाबतीत ही घटना घडली.

ख्रिस्ती सण सुरू झाल्याच्या निमित्ताने पोपनी विशेष भाषण केले. या भाषणात लसीकरण या विषयावर पोप बोलले. पोप यांच्या या भाषणाची बातमी देताना वृत्त निवेदिकेकडून चूक झाली. चुकीचे वक्तव्य आणि त्यानंतर मागितलेली माफी हा घटनाक्रम जेमतेम दोन सेकंदात घडला. पण नाताळच्या दिवशी पोपच्या मृत्यूची चुकीची बातमी देणारा छोटा व्हिडीओ अल्पावधीत व्हायरल झाला. व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अनेक सोशल मीडिया युझरनी प्रतिक्रिया दिल्या.

जर घोषणा झाल्यानंतर काही तासांतच पोपचा मृत्यू झाला असता तर पोलिसांनी आयटीव्ही आणि चुकीची बातमी देणाऱ्या वृत्त निवेदिकेची चौकशी केली असती; अशा स्वरुपाची प्रतिक्रिया एका युझरने दिली. तर व्हिडीओ बघून पोप ठीक आहेत नं?; अशा शब्दात एका युझरने विचारपूस केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी