Inspiring Video : जीवघेण्या वादळातही सोडली नाही साथ, जीवाला जीव देणाऱ्या पक्ष्यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल

जीवघेण्या वादळात दोन पक्षी एकमेकांना आधार देत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Inspiring Video
जीवघेण्या वादळातही सोडली नाही साथ  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वादळातही सोडली नाही साथ
  • एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न
  • पती-पत्नींसाठी आदर्श व्हिडिओ असल्याची चर्चा

Inspiring Video | प्रत्येकाला आपल्या आयुष्यात परफेक्ट जोडीदार मिळावा, असं वाटत असतं. परफेक्ट जोडीदार म्हणजे काय याची प्रत्येकाची व्याख्याही वेगवेगळी असते. मात्र एकदा का जोडीदार मिळाला आणि सोबत संसार सुरू झाला की एकमेकांना गृहित धरलं जातं आणि एकमेकांप्रति असणारा आदर आणि निष्ठा ढळू लागते. एकावर संकट आलं तर आपल्या जोडीदारासोबत ठामपणे उभे राहण्यास दुसरा जोडीदार नकार देतो आणि तिथूनच नात्यांची खरी परीक्षा सुरू होते. आपले स्वार्थ, आपला पैसा, आपली नाती आणि आपली प्रतिष्ठा ही दोघांनाही अधिक महत्त्वाची वाटू लागते आणि दोघांमधील अंतर वाढायला सुरुवात होते. संकटसमयी आपला जोडीदार आपल्यासोबत उभा राहिल, याची खात्री वाटणं बंद होतं आणि हीच खरी नाती तुटण्याची सुरुवात असते. एकमेकांसोबत सतत उभं राहणं आणि कायमच एकमेकांसाठी समर्पणाची भावना ठेवणं हे नात्यांमध्ये खूप महत्त्वाचं असतं. 

पक्ष्यांमधील केमिस्ट्री

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोन पक्ष्यांमधील केमिस्ट्री या व्हिडिओत पाहता येते. हा व्हिडिओ पाहून अनेकजण त्यावर फिदा होत आहेत. जीवावर बेतणारं संकट आलं असतानाही एकमेकांची साथ न सोडणाऱ्या या पक्ष्यांवरून लोक अक्षरशः जीव ओवाळून टाकत आहेत. एकमेकांवर प्रेम असावं तर असं, अशा प्रतिक्रिया लोक हा व्हिडिओ पाहून देत आहेत. 

अधिक वाचा - Optical Illusion: या सुंदर महिलेचे खरे डोळे पाहून घाबरून जाल, तिच्या डोळ्यांत आहे काहीतरी गौडबंगाल

वादळात दिली एकमेकांना साथ

या व्हिडिओत दोन पक्षी एका तारेवर बसल्याचं दिसतं. जोरदार पाऊस सुरू झाला असून वादळी वारे वाहत असल्याचं व्हिडिओत दिसतं. झाडाच्या फांद्याही जोरदार हलत आहेत आणि कुठल्याही क्षणी या पक्ष्यांचा बॅलन्स जाईल, असं वाटत राहतं. अशा स्थितीतही हे पक्षी एकमेकांचा विचार करत असल्याचं दिसतं. ते दोघंही एकमेकांना खेटून बसले आहेत आणि एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत. एकाचा जेव्हा तोल जाऊन लागतो, तेव्हा दुसरा त्याला सावरण्याचा प्रयत्न करतो आणि तारेवरून खाली पडू देत नाही. तेवढ्यात वाऱ्याचा मोठा लोट येतो आणि दुसरा पक्षी गडबडताना दिसतो. मात्र लगेचच पहिला पक्षी त्याला आपल्या पंखांचा आधार देतो आणि पडण्यापासून रोखतो, असं या व्हिडिओत दिसतं. केवळ काही सेकंदांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. 

अधिक वाचा - Viral Emotional Video: मरणाऱ्या बापाची मुलीने पूर्ण केली शेवटची इच्छा, इंजेक्शनद्वारे दिली दारू!

पती-पत्नींसाठी आदर्श व्हिडिओ

हा व्हिडिओ प्रत्येक पती-पत्नीनं पाहावा, असा सल्ला या व्हिडिओखाली कमेंट करणारे युजर्स देत आहेत. आयुष्य कसं जगावं, याचा वस्तुपाठ घालून देणारा हा व्हिडिओ असून गेल्या काही दिवसांपासून तो जोरदार व्हायरल होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी